Vitamin Capsule: व्हिटॅमिन कॅप्सूल घेताय? 'या' चुका पडतील महागात, अशी घ्या काळजी-vitamin capsule side effectstaking vitamin capsules be careful that these mistakes will be costly ,लाइफस्टाइल बातम्या
मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Vitamin Capsule: व्हिटॅमिन कॅप्सूल घेताय? 'या' चुका पडतील महागात, अशी घ्या काळजी

Vitamin Capsule: व्हिटॅमिन कॅप्सूल घेताय? 'या' चुका पडतील महागात, अशी घ्या काळजी

Sep 17, 2024 11:24 AM IST

Vitamin Capsules Side Effects: निरोगी केस, चमकणारी त्वचा आणि एकंदर सौंदर्य हवे आहे त्यांच्यासाठी व्हिटॅमिन कॅप्सूल हा एक उत्तम उपाय बनला आहे.

Vitamin Capsules Side Effects
Vitamin Capsules Side Effects (pixabay)

Vitamin Capsules Disadvantages:  आजच्या जगात, आरोग्याबाबत जागरूक असणारे लोक ज्यांना निरोगी केस, चमकणारी त्वचा आणि एकंदर सौंदर्य हवे आहे त्यांच्यासाठी व्हिटॅमिन कॅप्सूल हा एक उत्तम उपाय बनला आहे. चमकदार रंगासाठी व्हिटॅमिन सी पासून ते मजबूत नखे आणि केसांसाठी बायोटिनपर्यंत, हे पूरक पर्याय चांगले आणि कमी वेळेत परिणाम देतात. परंतु त्यांच्या वापरातील एखादी चूक केवळ हे फायदे कमी करत नाहीत, तर त्याचे आरोग्यावर दुष्परिणामदेखील होऊ शकतात.

*व्हिटॅमिन कॅप्सूल जास्त प्रमाणात सेवन केल्याने नुकसान होऊ शकते-

शरीराच्या विविध कार्यांसाठी व्हिटॅमिन्स आवश्यक आहेत. परंतु आपण जितके जास्त व्हिटॅमिन्स घ्याल तितके जास्त चांगले परिणाम दिसून येतील हा एक धोकादायक गैरसमज आहे. बऱ्याच लोकांचा असा विश्वास आहे की, अधिक व्हिटॅमिन्स घेतल्याने चांगले परिणाम मिळतात. म्हणूनच ते सुचविलेल्या डोसपेक्षा जास्त वापरतात. ही सवय, विशेषत: ए, डी, ई आणि के सारख्या चरबीत वितळणाऱ्या व्हिटॅमिन्सच्या बाबतीत, आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतात.

चरबीत विरघळणारे व्हिटॅमिन्स शरीरातील चरबीच्या ऊतींमध्ये आणि यकृतामध्ये साठवले जातात. पाण्यात विरघळणारे व्हिटॅमिन्स, जसे की व्हिटॅमिन सी आणि बी-कॉम्प्लेक्स जे जास्त प्रमाणात घेतल्यास लघवीद्वारे उत्सर्जित होतात, चरबीत विरघळणारे जीवनसत्त्वे कालांतराने जमा होतात. यामुळे हायपरविटामिनोसिस-व्हिटॅमिन टॉक्सिसिटी नावाची स्थिती निर्माण होऊ शकते. उदाहरणार्थ, जास्त प्रमाणात व्हिटॅमिन एमुळे यकृताचे नुकसान, हाडांचा कमकुवतपणा आणि अंधुक दृष्टी होऊ शकते. व्हिटॅमिन डीचे जास्त प्रमाणात सेवन केल्याने हायपरकॅल्शियम (रक्तात जास्त कॅल्शियम) होऊ शकते,.परिणामी मळमळ, अशक्तपणा आणि किडनी समस्या उद्भवू शकतात. व्हिटॅमिन ईच्या जास्त डोसमुळे, रक्त गोठण्यास व्यत्यय येऊ शकतो ज्यामुळे जास्त रक्तस्त्राव होण्याचा धोका असतो.

शरीराच्या पौष्टिक गरजा समजून घेणे परंतु व्हिटॅमिन सप्लिमेंट्सच्या वैयक्तिक पोषणविषयक गरजा समजून न घेता वापरणे ही वारंवार होणारी आणखी एक चूक आहे. लोक सहसा ट्रेंड किंवा जाहिरातींवर आधारित व्हिटॅमिन्स स्वत: लिहून घेतात. मात्र त्यांच्या विशिष्ट आहाराचे सेवन किंवा वैद्यकीय परिस्थितीकडे दुर्लक्ष करतात.

व्हिटॅमिन कॅप्सूलबाबत या चुका टाळा-

> कोणतीत्याही कॅप्सुलचे डोस सुरू करण्यापूर्वी नेहमी डॉक्टरांचा किंवा पोषणतज्ञांचा सल्ला घ्या, खासकरून जर तुम्हाला काही अंतर्गत आरोग्य समस्या असतील.

> डॉक्टरांनी दिलेल्या आवश्यकतेनुसार डोस घ्या. स्वतःहून जास्तीचे डोस घेणे टाळा.

> पोषणतज्ञांच्या सल्ल्याने आहारात संतुलन राखा.

>व्हिटॅमिन कॅप्सूल आरोग्यासाठी फायदे देऊ शकतात, परंतु अतिवापर किंवा गैरवापरामुळे हानिकारक परिणाम होऊ शकतात. जागरूकता आणि योग्य वापर ही आपली त्वचा, केस आणि एकूण आरोग्यासाठी अत्यंत उपयुक्त उपाय आहे.

 

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. याबाबतीत संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

Whats_app_banner
विभाग