How to Make Vitamin C Serum at Home: सोशल मीडियावर सध्या ब्युटी प्रॉडक्टसमध्ये व्हिटॅमिन सी सिरम प्रचंड लोकप्रिय ठरत आहे. जो-तो उठून व्हिटॅमिन सी सिरम खरेदी करत आहे. व्हिटॅमिन सी सिरम खरेदी करण्यासाठी लोक हजारो रुपये खरेदी करतात. परंतु आता असे करण्याची गरज नाही. कारण तुम्ही घरीच हे सिरम तयार करू शकता. तुम्हाला तुमचा टॅन झालेला चेहरा उजळवायचा असेल आणि तुमची त्वचा चमकदार आणि निरोगी बनवायची असेल, तर तुमच्यासाठी व्हिटॅमिन सी सीरम हा एक उत्तम पर्याय आहे. व्हिटॅमिन सी त्वचेसाठी खूप फायदेशीर आहे. यामुळे चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी होतात आणि रंग सुधारतो. आज आम्ही तुम्हाला व्हिटॅमिन सी सीरम घरी कसे बनवायचे ते अगदी सोप्या पद्धतीने सांगणार आहोत.
-व्हिटॅमिन सी पावडर - १ टीस्पून
-गुलाब पाणी - २ चमचे
-नारळ तेल - १ चमचे (पर्यायी, त्वचेला अतिरिक्त ओलावा देण्यासाठी)
-काचेची बाटली - सीरम ठेववण्यासाठी
घरी व्हिटॅमिन सी सीरम बनवण्यासाठी, एक चमचा व्हिटॅमिन सी पावडर दोन चमचे गुलाब पाण्यात मिसळा. जर त्वचा कोरडी असेल तर एक चमचा खोबरेल तेल देखील घाला. हे मिश्रण एका पांढऱ्या बाटलीत साठवा आणि रात्री झोपण्यापूर्वी चेहऱ्यावर हलक्या हाताने लावा. या सिरमच्या वापराने काहीच दिवसांत तुम्हाला चेहरा उजळलेला दिसून येईल.
चेहरा धुतल्यानंतर, घरी बनवलेले व्हिटॅमिन सी सीरम चेहऱ्यावर आणि मानेवर बोटांनी हळूवारपणे लावा. रात्री झोपण्यापूर्वी याचा वापर करा जेणेकरून सीरम रात्रभर त्वचेमध्ये चांगले शोषले जाईल. आणि तुमच्या त्वचेला पूर्ण पोषण मिळेल. जेणेकरून दुसऱ्या दिवशी चेहरा एकदम फ्रेश आणि ग्लोइंग दिसून येईल.
व्हिटॅमिन सी सीरम एका पांढऱ्या बाटलीत भरा आणि थंड आणि गडद ठिकाणी ठेवा. यामुळे सीरममधील ताजेपणा तसाच राहतो. शिवाय अशा ठिकाणी ठेवल्याने हे सिरम एक महिना सुरक्षित राहील.
व्हिटॅमिन सी सीरम तुमचा विविध कारणांमुळे काळा पडलेला रंग उजळवितो. शिवाय त्वचेचा पोत सुधारतो. याच्या नियमित वापराने त्वचेवर चमकही येण्यास मदत होते.
कोलेजन एक नैसर्गिक प्रथिने आहे, ज्याचे उत्पादन वयानुसार कमी होते. त्यामुळे चेहऱ्यावर सुरकुत्या आणि बारीक रेषा दिसण्याची समस्या निर्माण होते. अशा परिस्थितीत व्हिटॅमिनत्वचेचा ओलसरपणा टिकून राहतो-
मॅग्नेशियम एस्कॉर्बिल फॉस्फेट त्वचेच्या काळजीसाठी वापरल्या जाणाऱ्या, व्हिटॅमिन सीमध्येदेखील आढळते. त्यामुळे त्वचेची आर्द्रता टिकवून ठेवण्यास खूप मदत होते. सी सीरम कोलेजन उत्पादन वाढवण्यास मदत करते.