Travel in Winter: डिसेंबर महिना म्हणजे वर्षाचा शेवटचा महिना. वर्षभर राहिलेल्या सगळ्या गोष्टी पूर्ण करण्याचा महिना. या महिन्यात ख्रिसमस असल्याने सुट्टीही असते. या शिवाय नवीन वर्षाचं स्वागतही करायला या महिन्यात सगळेच उत्सुक असतात. या महिन्यात गुलाबी थंडी पण असते. अशा परिस्थितीत अनेकांना सुट्टीसाठी काही खास ठिकाणी जायचे असते. भारतात अशी काही ठिकाणे आहेत जी हिवाळ्यातही उबदारपणाची अनुभूती देतात. हे नैसर्गिक अचंबा बघण्यासाठी तुम्ही गरम पाण्याच्या झऱ्यांना भेट देऊ शकता. हे केवळ प्रवासासाठीच नाही तर आपल्या आरोग्यासाठीही खूप चांगले आहे. गरम पाणी आपल्या शरीरातील सर्व थकवा दूर करते आणि आपल्या शरीराला आराम देते. गरम पाण्याचा झरा नैसर्गिक झरासारखा असतो. त्या झऱ्यात गरम पाणी तलावाच्या स्वरूपात असते. भारतातही असे अनेक गरम पाण्याचे झरे आहेत जिथे तुम्ही जाऊन आनंद लुटू शकता.
हे ठिकाण लडाखपासून सुमारे १३८ किमी अंतरावर सिंधू नदीजवळ वसलेले आहे. येथे तुम्ही गरम पाण्याच्या झऱ्याचा आनंद लुटू शकता.
हे ठिकाण फार प्रिसद्ध आहे. केदारनाथच्या वाटेवर गौरीकुंड हे गाव आहे. गौरीकुंड हे थर्मल वॉटर स्प्रिंगसाठी लोकप्रिय आहे. केदारनाथला भेट देणारे भक्त ट्रेकिंग सुरुवात करण्याआधी येथे स्नान करतात आणि नंतर पुढे जातात.
मणिकरण साहिब हे एक तीर्थक्षेत्र आहे जिथे शिव मंदिर, गरम पाण्याचे झरे आणि गुरुद्वारा साहिब खूप प्रसिद्ध आहेत. येथे मंदिराच्या आवारात, पुरुष आणि महिलांसाठी वेगळे गरम पाण्याचे तलाव आणि शॉवर तसेच चेंजिंग रूम उपलब्ध आहेत.
मनालीजवळ वशिष्ठ नावाचे एक छोटेसे गाव आहे जे वशिष्ठ मंदिर आणि गरम पाण्याच्या झऱ्यासाठी प्रसिद्ध आहे. येथे महिला आणि पुरुषांसाठी आंघोळीची स्वतंत्र व्यवस्था आहे.
संबंधित बातम्या