Visa Free Countries For Indians: या उन्हाळ्याच्या सुट्टीत तुम्ही तुमच्या कुटुंबासह परदेशात जाण्याचा विचार करत असाल, तर आम्ही तुम्हाला अशा काही देशांची माहिती देत आहोत जिथे भारतीय पर्यटक व्हिसाशिवाय आरामात फिरू शकतात. ‘Henley Passport Index 2024’च्या नवीन अहवालानुसार, भारतीय पासपोर्टची लोकप्रियता वाढली आहे आणि यामुळेच जगातील ६२ देशांमध्ये भारतीयांना व्हिसा फ्री एंट्री मिळणार आहे. नव्या रँकिंगनुसार, जगभरातील पासपोर्टच्या यादीत भारत ८०व्या स्थानावर पोहोचला आहे आणि आता भारतीय नागरिक थायलंड, मॉरिशस, ओमान यांसारख्या देशांव्यतिरिक्त जगातील ६२ देशांमध्ये व्हिसाशिवाय प्रवेश करू शकतात. अशाच ५ प्रसिद्ध देशांबद्दल जाणून घेऊया, जिथे भारतीयांसाठी व्हिसा फ्री एन्ट्री आहे.
फिजी हा दक्षिण प्रशांत महासागरातील ३००पेक्षा जास्त बेटांचा एक सुंदर बेट देश आहे. पांढऱ्या वालुकामय समुद्रकिनाऱ्याचे स्वच्छ पाणी आणि अनेक नैसर्गिक चमत्कार येथे येणाऱ्या पर्यटकांसाठी आकर्षणाचे केंद्र आहेत. फिजीची बहुतेक बेटे सुमारे १५० दशलक्ष वर्षांपूर्वी सुरू झालेल्या ज्वालामुखीच्या क्रियाकलापांमुळे तयार झाली होती. वानुआ लेव्हू आणि तवेउनी बेटांवर आजही काही भू-औष्णिक क्रियाकलाप आढळतात. जर तुम्ही फिजीला भेट देण्याचा विचार करत असाल तर डेनाराऊ बेट, कोरल कोस्ट, मामानुका बेटे, व्हाया आयलंड, यासावा बेटांना नक्की भेट द्या.
मॉरिशस हे पर्यटकांमध्ये खूप लोकप्रिय आहे. मॉरिशसमध्ये पाच बेटे आहेत. मॉरिशस, रॉड्रिग्स, दोन अगालेगा बेटे आणि कार्गाडोस-काराजोस बेटे. मॉरिशस भारतीय पासपोर्ट धारकांना व्हिसा फ्री एन्ट्री देखील देते आणि ती 90 दिवसांसाठी वैध असते.
भारतीय पर्यटकांना इंडोनेशियाला भेट देण्यासाठी व्हिसाची गरज नाही. भारतीय लोक व्हिसाशिवाय तिथे ३० दिवस फिरू शकतात. जर, तुम्ही निसर्ग प्रेमी असाल, तर इंडोनेशियातील सुंदर समुद्रकिनारे, पाण्याखालील क्रियाकलाप, पारंपारिक आर्ट गॅलरी आणि स्वादिष्ट खाद्यपदार्थांचा नक्कीच आनंद घ्या.
बार्बाडोस हा निसर्गाच्या कुशीत वसलेला एक सुंदर देश आहे. हा देश पॅसिफिक महासागराच्या पश्चिम भागात कॅरिबियन बेटांवर स्थित आहे. येथे तुम्ही ९० दिवस व्हिसाशिवाय प्रवास करू शकता. हा देश सुंदर समुद्रकिनारे आणि ऐतिहासिक स्थळांसाठी ओळखला जातो.
कॅरेबियन बेट ग्रेनाडामध्येही भारतीयांना ९० दिवसांपर्यंत व्हिसासाठी कोणतेही शुल्क भरावे लागत नाही. पासपोर्ट क्रमवारीत त्याचा क्रमांक ३३वा आहे. या देशाला 'मसाल्यांचे बेट' असेही म्हणतात.
संबंधित बातम्या