मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Viral Video: व्हायरल ऑरेंज पील थेअरीवर आईने दिली भन्नाट प्रतिक्रिया, बसणार नाही विश्वास

Viral Video: व्हायरल ऑरेंज पील थेअरीवर आईने दिली भन्नाट प्रतिक्रिया, बसणार नाही विश्वास

Hiral Shriram Gawande HT Marathi
Feb 10, 2024 09:29 PM IST

Mother Reaction Video: एका इन्स्टाग्राम युजरने व्हायरल ऑरेंज पील थेअरीबद्दल तिच्या आईची प्रतिक्रिया असणारा एक व्हिडिओ शेअर केला आहे. पाहा ही व्हायरल झालेली क्लिप.

ऑरेंज पील थेअरबद्दल आईने दिलेल्या प्रतिक्रियाचा व्हायरल व्हिडिओ
ऑरेंज पील थेअरबद्दल आईने दिलेल्या प्रतिक्रियाचा व्हायरल व्हिडिओ

Viral Orange Peel Theory Mother Reaction: सोशल मीडियावर चांगलीच ट्रेंड झालेली ऑरेंज पील थेअरी अनेकांनी ट्राय केली. लोक आपल्या जोडीदाराची परीक्षा घेण्यासाठी त्याचा वापर करीत आहेत. हे ट्रेंड अशा लोकांभोवती आहे, जे त्यांच्या पार्टनरला संत्री सोलण्यासारखी एक साधी गोष्ट करण्यास सांगतात, जी ते स्वतः सहज करू शकतात. ट्रेंडनुसार एखादी व्यक्ती हे साधे काम करण्यास तयार आहे की नाही हे पाहण्यासाठी केले जाते आणि जर त्यांनी केले तर ते नात्याप्रती त्यांची कमिटमेंट दर्शवते. एका महिलेने आपल्या आईला ही थेअरी समजावून सांगण्याचा निर्णय घेतला आणि तिला या व्हायरल ट्रेंडची माहिती दिली. मात्र त्यानंतर जे घडले ते पूर्णपणे विनोदी आहे.

इन्स्टाग्राम युजर आणि कॉमेडियन आंचल अग्रवालने हा व्हिडिओ शेअर केला आहे. व्हिडिओमध्ये ती तिच्या आईला ऑरेंज पील थेअरीबद्दल माहिती आहे का असे विचारते आणि नंतर ट्रेंड समजावून सांगते. ज्यावर तिची आई अतिशय गंभीर स्वरात म्हणते, 'लो, सिर्फ संत्रा छिलनेसे ही इंप्रेस हो जाओगी? [म्हणजे फक्त संत्रा सोलल्याने इंप्रेस होशील]. त्यानंतर ती आपलं म्हणणं मांडते आणि हे संपूर्ण व्हिडिओ बघायला मजेशीर वाटतं.

हा व्हिडिओ पाच दिवसांपूर्वी शेअर करण्यात आला होता. तेव्हापासून व्हिडिओला ७.५ दशलक्षाहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत आणि ही संख्या अजूनही वाढत आहे. या शेअर केलेल्या व्हिडिओवर लोकांनी विविध कमेंट्स पोस्ट केल्या आहेत.

व्हिडिओबद्दल इन्स्टाग्राम युजर्सनी सुद्धा भन्नाट कमेंट दिल्या आहे. "तिचा मुद्दा बरोबर आहे! पोरी, तुमचा दर्जा उंचावा!", असे एका इन्स्टाग्राम युजरने पोस्ट केले आहे. "आंटीने खाल्लं आणि साल सोडली नाही," असे दुसऱ्या युजरने गंमतीने म्हटले आहे. तर तिसऱ्या युजरने हा सिद्धांत कमीत कमी प्रयत्नात होणारा असल्याचे म्हटले आहे. तर पाचव्या युजरने, आईने बार उंचावला असल्याचे लिहिले.

WhatsApp channel

विभाग