मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  बाबो! चिकन टिक्का मसाला कपकेकच्या Viral Video ने दिलाय नेटिझन्सला धक्का, तुम्ही ट्राय कराल का ही रेसिपी?

बाबो! चिकन टिक्का मसाला कपकेकच्या Viral Video ने दिलाय नेटिझन्सला धक्का, तुम्ही ट्राय कराल का ही रेसिपी?

Hiral Shriram Gawande HT Marathi
Jan 30, 2024 10:55 PM IST

Viral Video: सध्या इंटरनेटवर चिकन टिक्का मसाला कपकेक रेसिपीचा व्हिडिओ चांगला धुमाकूळ घालत आहे. इन्स्टाग्रामवर शेअर करण्यात आलेल्या रेसिपीमुळे अनेक नेटकऱ्यांना आश्चर्याचा धक्का बसला आहे.

चिकन टिक्का मसाला कपकेकचा व्हायरल व्हिडिओ
चिकन टिक्का मसाला कपकेकचा व्हायरल व्हिडिओ (HT)

Chicken Tikka Masala Cupcakes Recipe Viral Video: आजकाल फ्यूजन फूड्सचा ट्रेंड आहे. फ्यूजन फूड्सच्या दुनियेत असे काही कॉम्बिनेशन असतात जे लोकांना आवडतात. तर काही फ्युजनमुळे तुम्ही आश्चर्यचकित होऊ शकता. तर अनेक कॉम्बिनेशन डिसगस्टिंग वाटतात. नुकताच चिकन टिक्का मसाला कपकेकची रेसिपीच्या एका व्हिडिओवर नेटकऱ्यांमध्ये अशाच प्रतिक्रिया उमटत आहेत. ही ऑफबीट रेसिपी व्हायरल झाली आणि अनेक खवय्यांना आश्चर्याचा धक्का बसला आहे.

या रेसिपीचा व्हिडिओ @succhefful हँडलवरून इन्स्टाग्रामवर शेअर करण्यात आला आहे. यात एक व्यक्ती कढईत बटरचा स्लॅब टाकून केचपमध्ये मिसळताना दिसत आहे. नंतर त्यात चिकनचे तुकडे, भात आणि पीठ घालतात आणि ते एकत्र करतात. कपकेक ट्रे ला ग्रीस केल्यानंतर ती व्यक्ती एक चमचा चिकन बॅटरने भरून ओव्हनमध्ये शिजवते. चिकन शिजत असताना ते एका बाऊलमध्ये तांदूळ घेऊन त्यात चॉकलेट टाकून ओव्हन मध्ये शिजवले. नंतर ते शिजवलेले चिकन आणि चॉकलेट भात दोन्ही एकत्र करून त्याची चव घेतली. या पोस्टच्या कॅप्शनमध्ये @succhefful लिहिले की, 'तुमच्या भारतीय मित्रांना माझे चिकन टिक्का मसाला कपकेक आवडतील. या रेसिपी आयडियाबद्दल @coachcheran धन्यवाद. याच्या पुढे मी काय बनवू?"

ही पोस्ट काही दिवसांपूर्वी शेअर करण्यात आली. व्हिडिओ पोस्ट केल्यापासून त्याला एक लाखाहून अधिक व्ह्यूज आणि जवळपास तीन हजारांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत. या शेअरवर असंख्य कमेंट्सही आल्या आहेत. या रेसिपीवर अनेकजण संतापले आहेत. एका व्यक्तीने लिहिले, "कृपया पुन्हा स्वयंपाकघरात पाऊल ठेवू नका." तर दुसऱ्या युजरने "त्यातला कोणता भाग म्हणजे चिकन टिक्का मसाला? टिक्का कुठे आहे? मसाला? हे म्हणजे चिकन उकडलेले केचप असल्याचे कमेंट केले आहे. तिसऱ्या व्यक्तीने मी हे फेकून देईन असे म्हटले आहे.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

WhatsApp channel