मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Viral Video: फ्री स्नॅक्सपासून नॅपिंग रूमपर्यंत, पाहा मायक्रोसॉफ्ट कर्मचाऱ्यांना आणखी कोणते भत्ते मिळतात

Viral Video: फ्री स्नॅक्सपासून नॅपिंग रूमपर्यंत, पाहा मायक्रोसॉफ्ट कर्मचाऱ्यांना आणखी कोणते भत्ते मिळतात

Hiral Shriram Gawande HT Marathi
Feb 16, 2024 10:27 PM IST

Microsoft Employee: मायक्रोसॉफ्टच्या कर्मचारऱ्यांनी त्यांना ऑफिसमध्ये मिळणाऱ्या भत्त्यांविषयी पोस्ट केली. हा व्हिडिओ व्हायरल झाला असून, पोस्ट झाल्यानंतर त्यावर असंख्य प्रतिक्रिया येत आहेत.

Microsoft employees showing the perks they receive in office.
Microsoft employees showing the perks they receive in office. (Instagram/@twosisterslivingtheirlife)

Preks for Microsoft Employees: मायक्रोसॉफ्टच्या कर्मचाऱ्यांनी इन्स्टाग्रामवर कंपनीत काम करताना मिळणाऱ्या विविध सुविधा दाखवल्या आहेत. कर्मचाऱ्यांनी कार्यालयातील दैनंदिन अनुभवांवर प्रकाश टाकणारा एक व्हिडिओ तयार केला, ज्यात फ्री खाणे-पिणे, कम्फर्टेबल वर्कप्लेस आणि इतर विविध गोष्टींचा समावेश आहे. हा व्हिडिओ पोस्ट झाल्यानंतर तो सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि त्यावर अनेक प्रतिक्रिया उमटल्या आहेत.

या व्हिडिओमध्ये एक महिला आपल्या कार्यालयाचा कॅम्पस दाखवताना दिसत आहे. त्यानंतर इतर कर्मचारी त्यांच्याकडे वेंडिंग मशीनसोबत फ्री स्नॅक्स, मल्टी क्युसिन रेस्टॉरंट्स आणि अगदी नॅपिंग रूम कसे आहेत हे दाखवतात. तर काही जण त्यांना कुठूनही काम करण्याची परवानगी कशी दिली जाते, याबाबत सांगतात.

पाहा हा व्हिडिओ:

हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर 'twosisterslivingtheirlife' या हॅण्डलवरून शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडिओ १४ फेब्रुवारी रोजी इन्स्टाग्रामवर शेअर करण्यात आला होता. पोस्ट केल्यापासून या गाण्याला २० लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले असून असंख्य लाईक्स मिळाले आहेत. या पोस्टवर असंख्य प्रतिक्रियाही आल्या आहेत.

या पोस्टवर एका व्यक्तीने लिहिले, "कृपया मला कामावर घ्या आणि माझ्या आयुष्याला आशीर्वाद द्या." तर दुसऱ्या व्यक्तीने "तुमच्या सगळ्यांचा मला आणि इतरांना हेवा वाटत आहे." असे म्हटले आहे. "मायक्रोसॉफ्ट, तुम्ही कामावर घेत आहात का?" असे तिसऱ्या व्यक्तीने पोस्ट करत विचारले आहे. तर चौथ्या व्यक्तीने "आम्ही बेरोजगार आहोत, अर्थातच आम्हाला मायक्रोसॉफ्टसाठी अर्ज करायचा आहे." असे लिहिले. "आम्ही मायक्रोसॉफ्टचे कर्मचारी नाही, अर्थात आम्हाला तुमचा हेवा वाटतो" असे पाचव्या व्यक्तीने कमेंट केली आहे.

विभाग