Viral Video: पावभाजी विक्रेत्याचा देसी जुगाड, तव्याऐवजी वापरलं असं काही, पाहून लावाल डोक्याला हात
मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Viral Video: पावभाजी विक्रेत्याचा देसी जुगाड, तव्याऐवजी वापरलं असं काही, पाहून लावाल डोक्याला हात

Viral Video: पावभाजी विक्रेत्याचा देसी जुगाड, तव्याऐवजी वापरलं असं काही, पाहून लावाल डोक्याला हात

Published Sep 21, 2024 03:13 PM IST

social media viral: kushka.hakla' नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर करण्यात आलेला हा व्हायरल व्हिडिओ पाहून लोक थक्क झाले आहेत. हा व्हिडिओ पाहून काही लोकांना काय बोलावं हा प्रश्न पडलाय.

pav bhaji viral video
pav bhaji viral video

Pav bhaji viral video:  एकीकडे विज्ञानाने प्रगती करत उंच भरारी घेतली आहे. आणि येणाऱ्या प्रत्येक समस्येवर क्षणार्धात उपाय शोधला आहे. तर दुसरीकडे आपल्या देशात अशा लोकांची कमी नाही जे देसी जुगाडच्या माध्यमातून कोणत्याही समस्येवर उपाय शोधतात.

सोशल मीडियावर दररोज असे व्हिडिओ पाहायला मिळतात, ज्यामध्ये देसी जुगाड पाहून लोक थक्क होतात, तर अनेकांना जुगाड बनवणाऱ्यांच्या टॅलेंटची खात्री पटते. दरम्यान, देसी जुगाडशी संबंधित एक देसी व्हिडिओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल होत आहे. ज्यामध्ये तव्याऐवजी डीटीएचचा वापर केला जात आहे. एका व्यक्तीने चक्क डीटीएचच्या छत्रीवर पावभाजी बनवून लोकांना आश्चर्याचा धक्का दिला आहे.

'kushka.hakla' नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर करण्यात आलेला हा व्हायरल व्हिडिओ पाहून लोक थक्क झाले आहेत. हा व्हिडिओ पाहून काही लोकांना काय बोलावं हा प्रश्न पडलाय तर काही लोक त्या व्हिडिओचा खूप आनंद घेत आहेत. यावर प्रतिक्रिया देताना एका यूजरने लिहिले आहे- हे खाल्ले तर जिंदगी झिंगालाला, तर दुसऱ्याने लिहिले आहे- या व्यक्तीला लवकरात लवकर तुरुंगात पाठवले पाहिजे.

पावभाजी बनवण्याचा देसी जुगाड-

व्हायरल होत असलेल्या देसी व्हिडिओमध्ये असे दिसून येते की, तव्याच्या ऐवजी त्या व्यक्तीने डीटीएच छत्रीचे तव्यात रूपांतर केले आहे. ती व्यक्ती डीटीएच छत्रीवर पावभाजी बनवते आणि नंतर सर्व्ह करते. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर पावभाजीप्रेमींना मोठा धक्का बसला असेल. सध्या हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे. काही लोक या घटनेची मजा घेत आहेत. तर काहींनी त्यावर आक्षेप घेतला आहे.

 

मिळाले लाखोंमध्ये व्ह्यूव्ज-

'kushka.hakla' नावाच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून शेअर केलेल्या या व्हिडिओला आतापर्यंत १. ३२ लाखांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत. या व्हायरल व्हिडिओवर अनेकांच्या कमेंट्सही येत आहेत. एका यूजरने लिहिले आहे की, हे भारत आहे, जुगाडशिवाय येथे कोणतेही काम होत नाही.

 

Whats_app_banner