social media video: सोशल मीडियावर अनेक वेळा अशा टिप्स किंवा उपाय पाहायला मिळतात ज्या केवळ विचित्रच नाहीत तर कधी-कधी ते पाहून डोकं चक्रावून जातं. परंतु कधीकधी मनोरंजक हॅक देखील दिसतात. असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. वास्तविक, एका महिलेला पाईपमधून येणारे पाणी भांडी, कपडे इत्यादी धुण्यासाठी वापरावे लागत होते. अशा स्थितीत पाईप एका हाताने धरून भांडी धुणे अवघड झाल्याने महिलेने पाईप डोक्याला बांधून ठेवला आहे.
सोशल मीडियावर व्हायरल या व्हिडीओमध्ये महिलेने डोक्यावर पाईप ठेवून स्कार्फ बांधल्याचे तुम्हाला दिसेल. अशा स्थितीत पाणी नेमके तिच्या समोर पडते आणि तिचे दोन्ही हात काम करण्यासाठी मोकळे होतात. दोन्ही हातांचा वापर करून महिला आपले काम अतिशय आरामात करताना दिसत आहे. या जुगाडाने ती भांडीपासून कपड्यांपर्यंत सर्व काही धुते. या व्हिडिओला कॅप्शन देत 'वुमन ऑफ द इयर' असे लिहिले आहे.
बॅकग्रांउड म्युझिकसोबतच तुम्हाला ऐकायला मिळेल - 'हे सगळं काय बघायला लागतंय... किती अप्रतिम लोक आहेत आमच्याकडे.' हा व्हिडिओ kavita_mum इंस्टाग्राम हँडलवर शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडिओ इतक्या वेगाने व्हायरल होत आहे की, त्याला ९८ दशलक्षाहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. तसेच या व्हिडिओला १६ लाखांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत. या व्हिडिओवर अनेक युजर्सनी कमेंटही केल्या आहेत. या व्हिडिओवर बहुतांश युजर्स मजेशीर कमेंट करत आहेत.
एका युजरने लिहिले आहे - निरर्थक रीलसाठी वाया जाणारे पाणी. दुसऱ्याने लिहिले आहे - यासाठी काकूंना पुरस्कार द्या. तिसऱ्या व्यक्तीने लिहिले आहे - ही तर निन्जा टेक्निक आहे भाऊ. आणखी एका यूजरने लिहिले आहे - आणि लोक म्हणतात की महिलांचा मेंदू त्यांच्या गुडघ्यात असतो. दुसऱ्या व्यक्तीने लिहिले आहे - जेव्हा मेंदू १०० % वापरला जातो. आणखी एकाने लिहलंय 'काकींनी का डोकं लावलंय'.
तर पुढे एका यूजरने लिहिले आहे की, "भारत हा अनुभवी लोकांचा देश आहे." आणखी एका यूजरने लिहिले की, "ही महिला खरोखरच खूप सक्षम आहे." आणखी एका युजरने लिहिले आहे की, "मामीला यासाठी पुरस्कार मिळावा." आणखी एका युजरने लिहिले की, "महिला काहीही करू शकतात." सध्या या व्हिडीओची सोशल मीडियावर हवा आहे.
संबंधित बातम्या