VIRAL VIDEO: महिलेने तव्यावर बनवला फक्त एक पॉपकॉर्न, मिळाले ८ मिलियन व्ह्यूज, व्हिडीओमध्ये असं काय आहे?-viral video a video of a woman making just one popcorn on a griddle got 8 million views ,लाइफस्टाइल बातम्या
मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  VIRAL VIDEO: महिलेने तव्यावर बनवला फक्त एक पॉपकॉर्न, मिळाले ८ मिलियन व्ह्यूज, व्हिडीओमध्ये असं काय आहे?

VIRAL VIDEO: महिलेने तव्यावर बनवला फक्त एक पॉपकॉर्न, मिळाले ८ मिलियन व्ह्यूज, व्हिडीओमध्ये असं काय आहे?

Sep 25, 2024 01:49 PM IST

social media viral: एक व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आला आहे. ज्यामध्ये एक महिला तव्यावर फक्त एक पॉपकॉर्न बनवताना दिसत आहे.

popcorn viral video
popcorn viral video (instagram)

popcorn viral video:  इंटरनेटवर दररोज काही ना काही विचित्र व्हिडिओ व्हायरल होत असतात. यापैकी काही मजेदार व्हिडिओ पोस्ट होताच वाऱ्याच्या वेगाने व्हायरल होतात. तर काही व्हिडिओ असे असतात की ते लोकांना शेवटपर्यंत गुंतवून ठेवतात. ज्यामुळे त्यांचे व्ह्यूज खूप जास्त होतात. नुकताच असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आला आहे. ज्यामध्ये एक महिला तव्यावर फक्त एक पॉपकॉर्न बनवताना दिसत आहे. चला तर मग तुम्हालाही हा मजेदार व्हिडिओ दाखवूया...

सोशल मीडियावर व्हायरल या व्हिडिओमध्ये दिसत आहे की, एक महिला पॅनवर पॉपकॉर्न बनवत आहे. परंतु विशेष म्हणजे ती महिला फक्त एक पॉपकॉर्न बनवत आहे. यासाठी ती एक थेंब तेल आणि थोडे मीठ घालते. मग ती लाकडी चमच्याने ढवळते, मग ती छिद्रे असलेला चमचा आणते आणि कॉर्नवर ठेवते.

अशाप्रकारे ते काही वेळाने फुटून पॉपकॉर्नमध्ये बदलते. हा पॉपकॉर्न व्हिडीओ अगदी साधा असला तरी लोकांच्या संयमाची परीक्षा घेत असल्याचे दिसते. पुढे काय होणार या विचारात लोक संपूर्ण व्हिडिओ पाहतात.

एका महिलेचा पॅनवर फक्त एक पॉपकॉर्न बनवतानाचा हा व्हिडिओ इन्स्टाग्राम सारख्या लोकप्रिय सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर @alonaloewen नावाच्या अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. विशेष म्हणजे हा व्हिडीओ आतापर्यंत ८.७ कोटींहून अधिक लोकांनी पाहिला आहे. अनेक सोशल मीडिया यूजर्स या पोस्टवर कमेंट करत आहेत आणि आपापल्या प्रतिक्रिया देत आहेत.

 

एका यूजरने व्हिडीओवर कमेंट करत लिहिलं आहे की, - 'नॉन-स्टिक पॅनसोबत किती चूक होत आहे याची काळजी वाटत नाही का?' तर दुसऱ्या यूजरने लिहिले - 'ते काही सेकंद खूप तणावपूर्ण होते'. तर आणखी एकाने लिहलंय 'माझं धाडस पाहा मी इतक्या शांतपणे संपूर्ण व्हिडीओ पहिला'. तर आणखी एकाने लिहलय, 'वाया घालवण्यासाठी किती रिकामा वेळ आहे लोकांजवळ'. अशाप्रकारे अनेक कमेंट्स या व्हिडीओवर पाहायला मिळत आहेत.

Whats_app_banner
विभाग