Social Media Viral Video: सोशल मीडियावर सतत कोणते ना कोणते व्हिडिओ व्हायरल होत असतात. काही व्हिडिओ अगदी सामान्य असतात, तर काही व्हिडिओ अगदी आश्चर्यकारक असतात. सध्या सोशल मीडियावर असाच एक व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहून भल्याभल्यांच्या भुवय्या उंचावल्या आहेत. या व्हिडीओमध्ये तुम्हाला पाणीपुरी पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे या पाणीपुरीला थाई तडका देण्यात आला आहे. त्यापेक्षाही आश्चर्याची गोष्टी म्हणजे स्टफिंगसाठी छत्तीसगड स्पेशल मुंग्यांचा वापर करण्यात आला आहे. त्यामुळे हा व्हिडीओ चर्चेचा विषय बनला आहे.
प्रसिद्ध शेफ वरुण तोतलानी यांनी नुकतंच आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये आपल्याला ही हटके पाणीपुरी पाहायला मिळत आहे. या पाणीपुरीला थाई तडका देण्यात आला आहे. भारतीय आणि थायलंडच्या संयोगाने ही पाणीपुरी बनवण्याचा त्यांचा हटके प्रयत्न होता. विशेष म्हणजे या पाणीपुरीच्या स्टॅफिन्गसाठी शेफ्सनी छत्तीसगड स्पेशल लाल मुंग्या वापरण्यात आल्या आहेत. ही पाणीपुरी सध्या चर्चेला विषय बनली आहे. वरुण यांनी हा व्हिडीओ शेअर करताच तो व्हायरल होत आहे.
थायलंडमध्ये झालेल्या काही रेस्टोरंटच्या कोलॅबरेशनमध्ये ही डिश तयार करण्यात आली आहे. यामध्ये शेफ वरून तोतलानीसोबत शेफ टोन, शेफ क्वेकाचा यांनीही सहभाग घेतला होता. या सर्वांच्या प्रयत्नांतून ही फ्युजन पाणीपुरी बनवण्यात आली आहे. या पाणीपुरीमध्ये पुऱ्या या भारतीय वापरण्यात आल्या आहेत. तर पाणीपुरीचे पाणी म्हणून थाई नारळाचे दूध वापरण्यात आले आहे. आणि स्टफिंगसाठी थाई टोमॅटोची प्युरी आणि उकडलेले बीन्स घालण्यात आले आहेत. विशेष म्हणजे यामध्ये छत्तीसगड स्पेशल लाल मुंग्यासुद्धा गार्निश करण्यात आल्या आहेत. ही पाणीपुरी सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
मुंबईत जन्मलेले आणि वाढलेले, शेफ वरुण तोतलानी भारतीय पाककला अकादमीमध्ये शिकण्यासाठी हैदराबादला गेले होते. आणि नंतर न्यूयॉर्कमधील अमेरिकेच्या पाककला संस्थेतून पदवी प्राप्त केली. मुंबईला परतल्यावर, त्यांनी मास्क रेस्टोरंटच्या ग्रुपमध्ये सहभागी झाले. आणि २०२१ मध्ये सहाय्यक शेफ आणि २०२२ मध्ये हेड शेफ बनून नावारूपास आले.
संबंधित बातम्या