Orange Peel Theory Trending Memes: नोव्हेंबरची व्हायरल "ऑरेंज पील टेस्ट" आठवते का? ही तुमच्या रिलेशनची एक आंबट- गोड टेस्ट आहे. या सिद्धांतानुसार तुमचा जोडीदार तुमच्यासाठी संत्री कधी सोलतो ते तुमच्या नात्याची परीक्षा असते. जर तो विचार न करताच तुमच्यासाठी संतरे सोलून देत असेल, तर तो तुमच्यावर खरंच खूप प्रेम करतो! ही साधीशी गोष्ट तुमच्या नात्यातील त्याच्या काळजी आणि छोट्या गोष्टींवरही लक्ष देण्याची क्षमता दाखवते, असं या व्हायरल सिद्धांताचं मत आहे. यावरून सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ आणि पोस्ट व्हायरल झाले होते.
ऑरेंज पील थिअरी आता भारतातही धुमाकूळ घालत आहे. लोकांनी या सिद्धांताला एक मजेदार देसी ट्विस्ट दिला आहे. सोशल मीडियावर मजेदार मीम्स आणि गमतीशीर पोस्ट शेअर केल्या जात आहे. एवढंच नाही तर इतर देशांतील युजर्स देखील या सिद्धांताकडे पुन्हा आकर्षित झाले आहेत. चला तर याबाबतचे काही मजेदार मीम्स पाहा.
सर्वात लोकप्रिय असलेल्या पोस्टपैकी एक असलेल्या या पोस्टला आत्तापर्यंत ३.२ मिलियनपेक्षा अधिक व्ह्यूज मिळाले आहे. यावर अनेक युजर्संनी एकापेक्षा एक भन्नाट कमेंट केल्या आहेत.
या व्हायरल ट्रेंडबद्दल तुम्हाला काय वाटते? ऑरेंज पील थिअरीबद्दलचे हे मजेदार मीम्स तुम्हाला कसे वाटले?