Viral News: महिलेच्या कानात इअरफोनचा स्फोट, गमावली ऐकण्याची क्षमता, हा प्रकार टाळण्यासाठी WHO ची सूचना-viral news exploding earphones in womans ears loss of hearing who advises to prevent this ,लाइफस्टाइल बातम्या
मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Viral News: महिलेच्या कानात इअरफोनचा स्फोट, गमावली ऐकण्याची क्षमता, हा प्रकार टाळण्यासाठी WHO ची सूचना

Viral News: महिलेच्या कानात इअरफोनचा स्फोट, गमावली ऐकण्याची क्षमता, हा प्रकार टाळण्यासाठी WHO ची सूचना

Sep 26, 2024 10:15 AM IST

Ear damage due to earphones: महिलेच्या कानात इअरबडचा स्फोट झाला. आणि ती कायमची बहिरी झाली आहे. या महिलेने आपली ऐकण्याची पूर्ण क्षमता गमावली आहे.

Side effects of earphones
Side effects of earphones (freepik)

Side effects of earphones:  आजच्या काळात प्रत्येकाच्या कानात वायरलेस इअरफोन्स दिसतात. स्टायलिश असण्यासोबतच ते तुमच्यासाठी खूप सोयीस्करही आहेत यात शंका नाही, पण त्यांच्याशी संबंधित धोक्यांकडे दुर्लक्ष करणे योग्य नाही. नुकतंच तुर्कीमधील एका महिलेसोबत असेच घडले आहे. या महिलेच्या कानात इअरबडचा स्फोट झाला. आणि ती कायमची बहिरी झाली आहे. या महिलेने आपली ऐकण्याची पूर्ण क्षमता गमावली आहे. इअरबड्स वापरताना तुम्ही किती आणि कोणती काळजी घेतली पाहिजे?आणि त्यामुळे होणाऱ्या हानीपासून स्वतःचा बचाव कसा करायचा हे आज आपण जाणून घेणार आहोत.

रात्रंदिवस कानात इअरफोन-

तुम्हीही अशा लोकांपैकी आहात का जे, रात्रंदिवस कानात इअरफोन घालतात, बसताना किंवा चालतानासुद्धा कानात इअरफोन्स असतात. तर तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की तुमच्या या सवयीमुळे तुमच्या कानाला गंभीर नुकसान होऊ शकतो. किंबहुना, अनेक अहवाल असे सूचित करतात की मोठ्या आवाजात संगीत ऐकणे आणि इयरफोनचा जास्त वापर केल्याने कानाचा पडदादेखील फाटू शकतो. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन म्हणजेच WHO च्या म्हणण्यानुसार, इयरफोनच्या अतिवापरामुळे जगभरातील लाखो तरुणांच्या ऐकण्याच्या क्षमतेवर परिणाम होत आहे. त्यामुळे तुम्हाला वेळीच खबरदारी घेणे आहे.

इअरफोनचे गंभीर परिणाम-

आजकाल इयरफोन्स हा आपल्या दैनंदिन दिनचर्येचा अत्यावश्यक भाग बनला आहे. तुम्ही प्रवास करत असाल किंवा घरी आराम करत असाल, प्रत्येक परिस्थितीत लोक तासन्तास इअरफोन वापरत असतात. जेवताना किंवा व्यायाम करतानाही लोक कानात इअरफोन घातलेले दिसतात. परंतु हे अत्यंत चुकीचे आहे. कारण कोणत्याही गोष्टीचा अतिवापर तुम्हाला गंभीर परिणाम देऊ शकतो. सांगायचेच झाले तर, याच्या अतिवापरामुळे कानाचा पडदा सतत दाबाखाली राहतो आणि कालांतराने हे नुकसानही वाढत जाते. त्यामुळे कानाचा पडदा फाटण्याची दाट शक्यता असते.

काय आहे WHO चे मत-

वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन म्हणजेच WHO च्या म्हणण्यानुसार, इयरफोनच्या अतिवापरामुळे जगभरातील लाखो लोकांच्या, विशेषतः तरुणांच्या श्रवण क्षमतेवर गंभीर परिणाम होत आहे. याशिवाय इअरफोनच्या सतत वापरामुळे कानात संसर्ग, कानात दुखणे, डोकेदुखी आणि निद्रानाश यांसारख्या समस्याही उद्भवू शकतात.त्यामुळेच इअरफोन्सचा वापर योग्यरीत्या करणे गरजेचे आहे.

सावधानता बाळगणे आवश्यक आहे-

इअरफोन वापरताना, आवाज कमी ठेवणे, इयरफोन सतत न वापरणे आणि मध्ये ब्रेक घेणे यासारखी काही खबरदारी घेणे आवश्यक आहे. याशिवाय तुम्ही तुमचे कान नियमितपणे तपासले पाहिजेत आणि तुम्हाला कोणत्याही प्रकारची समस्या जाणवल्यास तुम्ही ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. या सूचना डब्ल्यूएचओकडून देण्यात आल्या आहेत.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

 

Whats_app_banner
विभाग