Viral Video: काय सांगता! बाजारात आलेत ब्लॅक कोब्रा मोमो, व्हिडीओचा सोशल मीडियावर धुमाकूळ-viral news black cobra momo went viral on social media ,लाइफस्टाइल बातम्या
मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Viral Video: काय सांगता! बाजारात आलेत ब्लॅक कोब्रा मोमो, व्हिडीओचा सोशल मीडियावर धुमाकूळ

Viral Video: काय सांगता! बाजारात आलेत ब्लॅक कोब्रा मोमो, व्हिडीओचा सोशल मीडियावर धुमाकूळ

Aug 31, 2024 09:48 AM IST

Viral black cobra momo on social media: बदलत्या काळानुसार मोमो हे आजकाल अनेकांचे आवडते स्ट्रीट फूड बनले आहे. अनेकांना वेगवेगळ्या प्रकारे मोमोज खायला आवडतात.

Viral Black Cobra Momo
Viral Black Cobra Momo

Viral Black Cobra Momo: भारताची खाद्यसंस्कृती फारच समृद्ध आहे. प्रत्येक व्यक्तीला विविध पदार्थांची चव चाखायला आवडते. शिवाय विविध राज्यांत विविध पदार्थ खास असतात. परंतु राज्याबाहेर जाऊन या पदार्थांना देशभरात ओळख मिळते. त्यामुळे या पदार्थांचे विविध प्रकार आपल्याला पाहायला मिळतात. त्यातीलच एक खाद्यपदार्थ म्हणजे मोमो होय. बदलत्या काळानुसार मोमो हे आजकाल अनेकांचे आवडते स्ट्रीट फूड बनले आहे. अनेकांना वेगवेगळ्या प्रकारे मोमोज खायला आवडतात.

वास्तविक, तुम्हाला बाजारात एकापेक्षा जास्त प्रकारचे मोमो मिळतील. या सगळ्यात काहींना वाफवलेले मोमोज खायला आवडतात, तर काहींना तळलेले मोमो चाखायला आवडतात. तर काही असे आहेत ज्यांना ग्रेव्हीवाले मोमो पसंत पडतात. मोमोवर सतत काही ना काही प्रयोग होत असतात. मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे यामध्ये ब्लॅक कोब्रा मोमो पाहायला मिळत आहेत. नाव ऐकूनच अनेकांना धडकी भरत आहे.

अलीकडच्या काळात सोशल मीडियावर विविध गोष्टी व्हायरल होत असतात. यामध्ये अशा अनेक गोष्टी असतात, जे पाहून भल्याभल्यांना आश्चर्य वाटते. सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये चक्क 'ब्लॅक कोब्रा मोमो' पाहायला मिळत आहेत. नाव ऐकूनच अनेकांना घाम फुटत आहे. ब्लॅक कोब्रा मोमोचा हा व्हिडिओ नुकताच जयपूर फूड वॉक नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, सर्व प्रथम एक व्यक्ती एका मोठ्या कढईमध्ये भरपूर मोमो ठेवते. आधी तो या मोमोजवर भरपूर मिक्स मसाले टाकतो आणि नंतर विविध सॉसेज घालतो.

यानंतर, तो व्यक्ती त्या कढईतील मोमोमध्ये इतक्या गोष्टी मिसळतो की हळूहळू मोमो काळ्या ग्रेव्हीमध्ये तरंगताना दिसतात. यानंतर तो व्यक्ती हे मोमो एका प्लेटमध्ये काढतो आणि नंतर त्यावर कच्च्या भाज्या घालून सर्व्ह करतो. मोमोने भरलेली कढई बघूनच अंदाज लावता येतो की, इतके सॉसेज आणि मसाल्यांनी भरलेले हे मोमो खूपच तिखट आणि मसालेदार असतील. कदाचित म्हणूनच त्यांना ब्लॅक कोब्रा मोमो असे म्हटले जात आहे.

 

मोमोचा हा भयानक प्रकार पाहून नेटकऱ्यांसुद्धा चांगलाच घाम फुटलाय. व्हिडीओ पाहून प्रत्येक व्यक्तीला कल्पना येत आहे की, हे खूप मसालेदार मोमो असतील. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडीओवर एका नेटकऱ्याने लिहलंय की, हे खाल्ल्यानंतर पोटात आग पडेल'. दुसऱ्या नेटकऱ्याने लिहलंय, हे मोमो फक्त बघूनच इतके घातक दिसतात, खाल्य्यानंतर काय होईल'. आणखी एका लिहलंय की, हे मोमो खाल्ल्यानंतर हॉस्पिटलला जावं लागेल. आणखी एका दुसऱ्या नेटकऱ्याने लिहलंय की, त्यात ब्लॅक कोब्राचे विष तर नाही ना'.