Video viral on social media: अलीकडे सोशल मीडियावर विविध व्हिडीओ व्हायरल होत असतात. हे व्हिडीओ पाहून सर्वांनाच आश्चर्य वाटतं. सध्या असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. यामध्ये एका महिलेच्या कानातून असं काही निघालं जे पाहून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसत आहे. आपले डोळे, कान आणि नाक हे शरीरातील असे अवयव आहेत जे अत्यंत संवेदनशील समजले जातात. त्यात छोटीशी जरी समस्या आली तर मोठे परिणाम दिसून येतात. त्यामुळे या अवयवांची विशेष काळजी घेतली जाते.
बहुतांश वेळा जळू एखाद्याच्या नाकात शिरल्याने श्वास घेणे कठीण होते, तर कधी कीटक डोळ्यात गेल्याने त्रास होतो. त्याचबरोबर अनेक लोकांच्या कानात अनेक वेळा किडे शिरतात, त्यामुळे त्यांना विचित्रच वाटत नाही तर कानात वेदनाही होऊ लागतात. सध्या सोशल मीडियावर एक असाच व्हिडीओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये एका वृद्ध महिलेच्या कानात असंच काहीतरी शिरलंय जे पाहून लोकांना भीतीही वाटत आहे आणि आश्चर्यसुद्धा वाटत आहे.
असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एक महिला कानात खाज सुटल्याने आणि त्यामुळे होणाऱ्या वेदनांनी त्रस्त होती. अशा स्थितीत तिच्या मुलीने कानात तेलाचे दोन थेंब टाकले आणि आतून एक भितीदायक गोष्ट बाहेर आली. हा चक्क एक कोळी होता, ज्याची अनेकांना भीती वाटत आहे. असे अनेक कोळी आहेत जे विषारी मानले जातात. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
व्हायरल होत असलेला व्हिडिओ @homienewsinc नावाच्या एका इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला कॅप्शन देत लिहलंय, 'या महिलेला तिच्या कानात काहीतरी हलत असल्याचे जाणवले, आणि अंदाज लावा की तिला काय सापडले? एक कोळी, जो तेल घालताच बाहेर आला!' व्हायरल व्हिडिओमध्ये, मुलीने सांगितले आहे की, तिच्या आईला तिच्या कानात तीव्र खाज आणि वेदना होत होत्या. मुलीने आईच्या कानात औषधाच्या तेलाचे दोन थेंब टाकले.
सुरुवातीला काही मोठा प्रॉब्लेम नसेल असे महिलेला वाटले. पण काही वेळातच ती जोरजोरात ओरडू लागते. अचानक तिच्या कानातून एक कोळी बाहेर येतो. त्या महिलेची मुलगी म्हणते की, मी सांगितले होते की तिथे काहीतरी किडा असेल. बघ, तो बाहेर आला आहे. तो काहीही नसून चक्क एक कोळी आहे. ते पाहून महिलेला धक्का बसला आहे. कोळी महिलेच्या कानातून निघून तिच्या समोर ठेवलेल्या टॉवेलवर उडी मारतो.