Strange discoveries of American scientists: तुम्हाला हे माहित असेलच की, आपल्या आजूबाजूला असे लाखो आणि करोडो जीव आहेत ज्यांना आपण उघड्या डोळ्यांनी पाहू शकत नाही. जीवाणू, विषाणू किंवा इतर लहान जीव हे केवळ सूक्ष्मदर्शकाच्या मदतीने दिसतात. परंतु आश्चर्याची गोष्ट म्हणजे हे जीव आपल्या शरीरावर देखील राहतात. परंतु आपण त्यांना पाहू शकत नाही. महत्वाचं म्हणजे हे जीव तुमच्या चेहऱ्यावरसुद्धा असतात. वाटलं ना आश्चर्य? पण हे खरं आहे. चेहऱ्यावर हजारो जीव रेंगाळत असतात, पंरतु आपण ते पाहू शकत नाही. हे जीव केवळ सूक्ष्मदर्शीचा वापर करूनच पाहू शकतो.
त्यामुळेच सकाळी उठल्याबरोबर चेहरा पाण्याने स्वच्छ धुवावा. जर तुम्ही असे करत नसाल, तर लगेच स्वतःला ही सवय लावून घ्या. अन्यथा यामागील सत्य जाणून घेतल्यावर तुम्हाला धक्का बसेल. ज्याप्रमाणे आपल्या शरीराच्या इतर अनेक भागांवर जीव असतात. त्याचप्रमाणे चेहऱ्यावरदेखील (फेस माइट्स) अनेक जीव असतात. हे जीव चेहऱ्याच्या केसांच्या मुळांमध्ये असतात. आताही हे जीव तुमच्या चेहऱ्यावर रेंगाळत आहेत हे जाणून तुम्हाला भीती वाटेल. परंतु हे केवळ सूक्ष्मदर्शकाद्वारेच पाहू शकतो. व्हॉक्स वेबसाइटनुसार, हे प्राणी कोळीच्या प्रजातींचे आहेत.
अमेरिकेच्या कृषी विभागाचे शास्त्रज्ञ रॉन ओचोआ यांनी वेबसाइटशी बोलताना सांगितले होते की, ९९.९ टक्के लोकांच्या चेहऱ्यावर हे माइट्स असतात. हे आपल्या चेहऱ्यावर सर्वाधिक असतात पण शरीराच्या केसांच्या मुळांमध्येही असतात. मानवी शरीरावर लाखो माइट्स असतात. विशेष म्हणजे रात्रीच्या वेळी हे किडे मुळातून बाहेर पडतात. आणि चेहऱ्यावर जाळी विणून आपली प्रजाती वाढवण्याचे काम करतात. हे कीटक चेहऱ्यावर तयार होणारे नैसर्गिक तेल खातात.
अमेरिकन शास्त्रज्ञांच्या मते, या कीटकांना डेमोडेक्स फॉलिक्युलोरम आणि डेमोडेक्स ब्रेव्हिस म्हणतात. शास्त्रज्ञांना त्यांच्याबद्दल फारशी माहिती नाही. या कारणांमुळेच सकाळी उठल्याबरोबर तोंड धुण्याचा सल्ला दिला जातो. अलीकडेच सोशल मीडिया साइट रेडिटवर कोणीतरी विचारले की, सर्वात आश्चर्यकारक वैद्यकीय तथ्य काय आहे. यावर शास्त्रज्ञांनी चेहऱ्यावरील कीटकांची माहिती देत सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला आहे.
(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. याबाबतीत संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)