Marathi Jokes: मास्तर जेव्हा मुलाला इंडिया गेट काय आहे विचारतात...
मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Marathi Jokes: मास्तर जेव्हा मुलाला इंडिया गेट काय आहे विचारतात...

Marathi Jokes: मास्तर जेव्हा मुलाला इंडिया गेट काय आहे विचारतात...

Jan 25, 2025 10:22 AM IST

Marathi Short Jokes : हसण्यामुळं चेहन्याच्या स्नायूंचा व्यायाम होतो. चेहरा ताजातवाना आणि टवटवीत राहतो. तुम्हालाही तरुण दिसायचं असेल आणि निरोगी राहायचं असेल तर हसण्याची सवय लावा. हे जोक वाचा.

Joke of the day
Joke of the day

Viral jokes in Marathi: आजकाल धावपळीच्या जीवनशैलीमुळे प्रत्येकाला ताणतणावाला सामोरं जावं लागतं. अशा वेळी माणसाला काही निवांत आणि मन प्रसन्न करणाऱ्या क्षणांची सोबत हवी असते. शब्द ही सोबत देऊ शकतात. हे लक्षात घेऊन तुम्हाला तणावमुक्त आणि सकारात्मक ठेवण्यासाठी आम्ही काही मजेदार जोक्स घेऊन आलो आहोत. ते वाचून तुम्हाला हसू आवरणार नाही। वाचा तर मग...

 

1) जिव्हारी लागेल असा अपमान...

Employee working from home.

आई - जा बाळा , बाजारातून जरा सामान घेऊन ये...

Son - आई , आत्ता client चा काॅल आहे. नंतर जाऊ शकतो का ?

आई - *I am working on that* आणी *I will get back to you soon* एवढच बोलायच आहे ना .. मी बोलते ..

तु सामान घेऊन ये!

 

2) मास्तर : इंडिया गेट काय आहे?

मुलगा : बासमती तांदूळ.

मा : चारमिनार?

मु : सिगरेट.

मा : ताजमहाल?

मु : चहा.

मा : गाढवा! देशातील इतकी प्रख्यात स्थळं तुला माहिती नाहीत. जा, तुला नापास केलं. उद्या येताना वडिलांची सिग्नेचर आण.

दुसऱ्या दिवशी पोरगं चकचकीत कागदात गुंडाळलेलं पुडकं आणून टेबलावर ठेवतं.

मास्तर : हे रे काय?

पोरगं : बाबांची सिग्नेचर. आख्खी बाटली आणली.

मास्तर गहिवरून आले. पोराला छातीशी धरून म्हणाले, "अरे वेडा कुठला. कोण म्हणतं तू नापास झाला? तुला शंभर पैकी शंभर!"

 

(टीप: हा निखळ विनोद आहे. त्याकडे विनोदाच्या नजरेतूनच पाहावे. यातून कोणत्याही प्रकारे कोणाच्याही भावना दुखावण्याचा हेतू नाही. स्त्रोत - व्हॉट्सअ‍ॅप)

 

Whats_app_banner