Viral Marathi Jokes: उत्तम आरोग्यासाठी शुद्ध हवा, शुद्ध पाणी व चांगल्या अन्नाबरोबरच खळखळून हसण्याचीही गरज असते. तुम्हालाही निरोगी राहायचं असेल तर हसण्याची सवय लावा.
नवरा-बायकोचं जोरदार भांडण झालं...
दोघंही मागं हटायला तयार नव्हते...
रागाच्या भरात नवरा म्हणाला, तुझ्यासारखे खूप पाहिलेत... काय करायचं ते कर, जा!
ते भांडण होऊन आज तीन दिवस झाले, नवरा अजूनही मोबाइलचा चार्जर शोधतोय!
...
बंड्या झाडाला उलटा लटकला होता...
पप्पूनं विचारलं, हे काय करतोयस?
बंड्या : काही नाही रे, डोकेदुखीची गोळी खाल्लीय. ती पोटात जाऊ नये म्हणून उलटा लटकलोय
तेव्हापासून पप्पू स्वत:चं डोकं धरून बसलाय!
(टीप: हा निखळ विनोद आहे. त्याकडे विनोदाच्या नजरेतूनच पाहावे. यातून कोणत्याही प्रकारे कोणाच्याही भावना दुखावण्याचा हेतू नाही.)