Joke of the day : डॉक्टर जेव्हा महिलेला सीटी स्कॅन करण्याचा सल्ला देतात…
मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Joke of the day : डॉक्टर जेव्हा महिलेला सीटी स्कॅन करण्याचा सल्ला देतात…

Joke of the day : डॉक्टर जेव्हा महिलेला सीटी स्कॅन करण्याचा सल्ला देतात…

HT Marathi Desk HT Marathi
Mar 09, 2024 10:03 AM IST

Marathi Short Jokes : हसण्यामुळं चेहऱ्याच्या स्नायूंचा व्यायाम होतो. चेहरा ताजातवाना आणि टवटवीत राहतो. तुम्हालाही तरुण दिसायचं असेल आणि निरोगी राहायचं असेल तर हसण्याची सवय लावा. हे जोक वाचा!

Joke of the day : डॉक्टर जेव्हा महिलेला सीटी स्कॅन करण्याचा सल्ला देतात…
Joke of the day : डॉक्टर जेव्हा महिलेला सीटी स्कॅन करण्याचा सल्ला देतात…

 

Viral Marathi Jokes : उत्तम आरोग्यासाठी शुद्ध हवा, शुद्ध पाणी व चांगल्या अन्नाबरोबरच खळखळून हसण्याचीही गरज असते. तुम्हालाही निरोगी राहायचं असेल तर हसण्याची सवय लावा.

दोन वेडे मित्र गप्पा मारत असतात.

बोलता-बोलता ते भूतकाळात जातात. एकमेकांचं बालपण आठवू लागतात.

पहिला  - तुझा जन्म कोणत्या दिवशी झाला रे?

दुसरा  - सोमवारी. आणि तुझा कधी झाला रे?

पहिला - रविवारी.

दुसरा - (काही वेळ विचार करून) कसं शक्य आहे? रविवारी सुट्टी असते.

….

मी - लेक्चरमध्ये आहे!

मित्र - कोणता विषय आहे? 

मी - घरच्या लेक्चरमध्ये आहे आणि विषय मीच आहे.

महिला - डॉक्टर माझं डोकं दुखतंय!

डॉक्टर महिलेला तपासतात आणि सांगतात,

सिटी स्कॅन करावं लागेल.

महिला - पण माझ्या एकटीच्या त्रासासाठी सगळी सीटी स्कॅन करायची गरज काय डॉक्टर?

त्या दिवसापासून डॉक्टरांनी क्लिनिकमध्ये जाणं बंद केलंय…

 

(टीप : हा निखळ विनोद आहे. त्याकडे विनोदाच्या नजरेतूनच पाहावे. यातून कोणत्याही प्रकारे कोणाच्याही भावना दुखावण्याचा हेतू नाही. स्त्रोत - व्हॉट्सअ‍ॅप )

Whats_app_banner