मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Joke of the day : नवरा जेव्हा बायकोचा वाढदिवस विसरतो…

Joke of the day : नवरा जेव्हा बायकोचा वाढदिवस विसरतो…

HT Marathi Desk HT Marathi
Mar 23, 2024 11:15 AM IST

Marathi Short Jokes : हसण्यामुळं चेहऱ्याच्या स्नायूंचा व्यायाम होतो. चेहरा ताजातवाना आणि टवटवीत राहतो. तुम्हालाही तरुण दिसायचं असेल आणि निरोगी राहायचं असेल तर हसण्याची सवय लावा. हे जोक वाचा!

Joke of the day : नवरा जेव्हा बायकोचा वाढदिवस विसरतो…
Joke of the day : नवरा जेव्हा बायकोचा वाढदिवस विसरतो…

 

Viral Marathi Jokes : उत्तम आरोग्यासाठी शुद्ध हवा, शुद्ध पाणी व चांगल्या अन्नाबरोबरच खळखळून हसण्याचीही गरज असते. तुम्हालाही निरोगी राहायचं असेल तर हसण्याची सवय लावा.

नवरा - आज तुझा उपवास आहे का?

बायको - हो

नवरा - काही खाल्लंस का?

बायको - होय

नवरा - काय

बायको - खिचडी, सफरचंद, डाळींब, शेंगदाणे, साबूदाण्याची खीर, बटाट्याचे वेफर्स, साबुदाण्याचे पापर, राजगिऱ्याचे लाडू. सकाळी एक कप चहा घेतला होता. आता ज्यूस घेतेय.

नवरा - खूपच कडक उपवास आहे. सगळ्यांना जमत नाही हे.

….

अ‍ॅम्बुलन्सवाला - हो आहे. कुठे पाठवायची? काय झालं?

माझ्या साडीवर कॉफी सांडली.

अ‍ॅम्बुलन्सवाला - बापरे, खूप भाजलंय का?

नाही. 

माझा नवरा माझ्यावर हसला.

अ‍ॅम्बुलन्सवाला - समजलं मॅडम. लगेच पाठवतो.

….

तुम्ही माझा वाढदिवस विसरूच कसे शकता?

नवरा - अंग तुझं वाढदिवस मी लक्षात ठेवावा असं वाटलंच नाही पाहिजे तुला.

तुझं वय वाढलंय असं वाटतच नाही!

बायको - अय्या. खरंच!

नवरा - (मनातल्या मनात) टायमावर डायलॉग आठवला म्हणून बरं झालं. नाहीतर काही खरं नव्हतं आज.

 

(टीप : हा निखळ विनोद आहे. त्याकडे विनोदाच्या नजरेतूनच पाहावे. यातून कोणत्याही प्रकारे कोणाच्याही भावना दुखावण्याचा हेतू नाही. स्त्रोत - व्हॉट्सअ‍ॅप)

विभाग