Marathi Jokes : आजकाल धावपळीच्या जीवनशैलीमुळे प्रत्येकाला ताणतणावाला सामोरं जावं लागतं. अशा वेळी माणसाला काही निवांत आणि मन प्रसन्न करणाऱ्या क्षणांची सोबत हवी असते. शब्द ही सोबत देऊ शकतात. हे लक्षात घेऊन तुम्हाला तणावमुक्त आणि सकारात्मक ठेवण्यासाठी आम्ही काही मजेदार जोक्स घेऊन आलो आहोत. ते वाचून तुम्हाला हसू आवरणार नाही! वाचा तर मग…
बॉसनं जोक सांगितल्यावर संपूर्ण टीम हसायला लागली.
फक्त एक मुलगा हसला नाही...
बॉसने विचारलं, तुला माझा जोक समजला नाही का?
मुलगा - सर, माझी दुसऱ्या कंपनीत निवड झाली आहे...
…
गप्पू - मम्मी, अॅडमिशन फॉर्ममध्ये माझी ओळख सांगणारं चिन्ह कोणतं लिहू?
मम्मी - हातात मोबाईल असं दाखव.
…
बस थांब्यावर बसची वाट बघणाऱ्या एका नोकरदारापुढं एक भिकारी हात पुढं करतो…
नोकरदार माणूस - तू भीक कशाला मागतो? धडधाकट आहेस. काही तरी काम कर. भीक मागणं चांगलं काम नाही!
भिकारी - साहेब, तुम्ही कधी भीक मागितलीय का?
नोकरदार माणूस - नाही
भिकारी - मग तुम्हाला कसं माहीत की भीक मागणं चांगलं काम नाही!
(नोकरदार पैसे न देताच निघून गेला)
(टीप : हा निखळ विनोद आहे. त्याकडे विनोदाच्या नजरेतूनच पाहावे. यातून कोणत्याही प्रकारे कोणाच्याही भावना दुखावण्याचा हेतू नाही. स्त्रोत - व्हॉट्सअॅप)