मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Joke of the day : बंड्या जेव्हा पहिल्यांदाच मुलगी बघायला जातो…

Joke of the day : बंड्या जेव्हा पहिल्यांदाच मुलगी बघायला जातो…

HT Marathi Desk HT Marathi
Mar 19, 2024 10:26 AM IST

Marathi Short Jokes : हसण्यामुळं चेहऱ्याच्या स्नायूंचा व्यायाम होतो. चेहरा ताजातवाना आणि टवटवीत राहतो. तुम्हालाही तरुण दिसायचं असेल आणि निरोगी राहायचं असेल तर हसण्याची सवय लावा. हे जोक वाचा!

Joke of the day : बंड्या जेव्हा पहिल्यांदाच मुलगी बघायला जातो…
Joke of the day : बंड्या जेव्हा पहिल्यांदाच मुलगी बघायला जातो…

 

Viral Marathi Jokes : उत्तम आरोग्यासाठी शुद्ध हवा, शुद्ध पाणी व चांगल्या अन्नाबरोबरच खळखळून हसण्याचीही गरज असते. तुम्हालाही निरोगी राहायचं असेल तर हसण्याची सवय लावा.

 

बंड्या पहिल्यांदाच मुलगी बघायला गेला…

इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्यावर मुलीकडचे लोक मुद्द्यावर आले.

मुलीचे बाबा - तुम्ही दारू वगैरे पिता का?

बंड्या - ते नंतर. आधी पोहे, चहा-पाणी होऊ द्या.

मुलीला बघू द्या. नंतर बसू

गण्या पुन्हा एकदा मेडिकलमध्ये गेला आणि डोकेदुखीच्या गोळ्या मागू लागला!

केमिस्ट - तुम्हाला किती वेळा सांगितलं डोकेदुखीच्या गोळ्या हव्या असतील तर डॉक्टरची चिठ्ठी घेऊन या...

प्रत्येक वेळी मॅरेज सर्टिफिकेट काय दाखवता?

जरा त्या पिंकीकडं बघ. तिला ९० टक्के मिळालेत.

बाबू - तिच्याकडं बघत बसलो म्हणूनच तर नापास झालो!

माणसाचं वय जसं वाढत जातं, तसा तो श्रीमंत होत जातो…

केसात चांदी, दातात सोने, डोळ्यात मोती, रक्तात साखर, किडनीत स्टोन आणि हातात स्टीलचं रॉड येतं…

 

(टीप : हा निखळ विनोद आहे. त्याकडे विनोदाच्या नजरेतूनच पाहावे. यातून कोणत्याही प्रकारे कोणाच्याही भावना दुखावण्याचा हेतू नाही. स्त्रोत - व्हॉट्सअ‍ॅप)

WhatsApp channel

विभाग