Viral Marathi Jokes : उत्तम आरोग्यासाठी शुद्ध हवा, शुद्ध पाणी व चांगल्या अन्नाबरोबरच खळखळून हसण्याचीही गरज असते. तुम्हालाही निरोगी राहायचं असेल तर हसण्याची सवय लावा.
बाई - हा टीव्ही कितीचा आहे भाऊ?
टीव्हीवाला - ५५,००० रुपये फक्त
बाई - एवढा महाग? असं काय आहे या टीव्हीमध्ये?
टीव्हीवाला - हा टीव्ही लाइट गेली की आपोआप बंद होऊन जातो.
बाई - काय म्हणता? पॅक करा!
…
आज सकाळीच तिचा फोन आला…
रडत होती… मला सॉरी म्हणाली…
त्याच अवस्थेत म्हणत होती…
माझी चूक झाली. यापुढं असं होणार नाही
मी तुझ्याशी भांडणार नाही… तू म्हणशील ते ऐकेन!
हे सगळं ऐकून मी गहिवरून गेलो!
.
कुणाची बायको होती माहीत नाही.
बहुतेक राँग नंबर होता, पण बरं वाटलं!
…
बायको - नाश्त्याला मध देऊ का?
नवरा - नको. तो मध मधमाशांच्या तोंडातून आलेला असतो.
तोंडातून आलेलं मी खात नाही.
बायको - मग अंडी देऊन का?
(टीप : हा निखळ विनोद आहे. त्याकडे विनोदाच्या नजरेतूनच पाहावे. यातून कोणत्याही प्रकारे कोणाच्याही भावना दुखावण्याचा हेतू नाही. स्त्रोत - व्हॉट्सअॅप )