मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Joke of the day : बायको जेव्हा नवऱ्याला म्हणते, मी तुमच्याशी कमी भांडणार!

Joke of the day : बायको जेव्हा नवऱ्याला म्हणते, मी तुमच्याशी कमी भांडणार!

HT Marathi Desk HT Marathi
Mar 06, 2024 10:03 AM IST

Marathi Short Jokes : हसण्यामुळं चेहऱ्याच्या स्नायूंचा व्यायाम होतो. चेहरा ताजातवाना आणि टवटवीत राहतो. तुम्हालाही तरुण दिसायचं असेल आणि निरोगी राहायचं असेल तर हसण्याची सवय लावा. हे जोक वाचा!

Joke of the day : बायको जेव्हा नवऱ्याला म्हणते, मी तुमच्याशी कमी भांडणार!
Joke of the day : बायको जेव्हा नवऱ्याला म्हणते, मी तुमच्याशी कमी भांडणार!

 

Viral Marathi Jokes : उत्तम आरोग्यासाठी शुद्ध हवा, शुद्ध पाणी व चांगल्या अन्नाबरोबरच खळखळून हसण्याचीही गरज असते. तुम्हालाही निरोगी राहायचं असेल तर हसण्याची सवय लावा.

 

बायको - अहो ऐकलंत का? 

नवरा - (त्रासलेल्या स्वरात) काय? बोलं!

बायको - या महिन्यात मी तुमच्याशी कमी भांडणार

नवरा - अरे व्वा! कसं काय?

बायको - कारण हा महिना २८ दिवसांचा आहे.

नवरा-बायकोमध्ये भांडण सुरू असतं.

नवरा - तुझी आईच माझ्या मागे लागली होती, म्हणे माझ्या मुलीशी लग्न करा! लग्न करा!

बायको - हो, तुम्ही पण मला पसंत नव्हता. पण आई सारखी समजावून सांगायची.

अगं नवरा मूर्ख असला की संसार सुखाचा होतो!

बायको जोमात, नवरा कोमात

सासू - सूनबाई, असे हात मोकळे ठेवणं चांगलं नाही

सून - मी मोबाइल चार्जिंगला लावलाय सासूबाई

सासू - अगं भवाने, मी बांगड्यांबद्दल बोलतेय!

 

(टीप : हा निखळ विनोद आहे. त्याकडे विनोदाच्या नजरेतूनच पाहावे. यातून कोणत्याही प्रकारे कोणाच्याही भावना दुखावण्याचा हेतू नाही. स्त्रोत - व्हॉट्सअ‍ॅप )

WhatsApp channel

विभाग