Viral Marathi Jokes : उत्तम आरोग्यासाठी शुद्ध हवा, शुद्ध पाणी व चांगल्या अन्नाबरोबरच खळखळून हसण्याचीही गरज असते. तुम्हालाही निरोगी राहायचं असेल तर हसण्याची सवय लावा.
ते दोघे खूप दिवस एकमेकांना चोरून पाहत असतात.
ती त्याला स्माइल देते, तोही प्रतिसाद देतो.
एक दिवस पहिल्यांदाच ते भेटतात.
ती - मला श्रीमंत मुलं आवडतात…
हे ऐकून तो लगेच तिथून निघतो!
तेवढ्यात ती विचारते, कुठं चाललास?
तो - अगं, मोबाइलची चार्जिंग संपलीय.
नवीन मोबाइल घ्यायला जातोय!
…
एक मुलगा देवाला विचारतो,
तिला गुलाबाचं फूल का आवडतं? ते तर एका दिवसात मरून जातं!
मग तिला मी का आवडत नाही?
मी तर तिच्यासाठी रोज मरत असतो!
देव उत्तर देतो…
भारी रे !!! व्हॉट्सअॅपवर टाक!
…
माझं कोणीच काही बिघडवू शकत नाही!
कारण,
.
.
माझं सगळं आधीच बिघडलेलं हाय!
(टीप : हा निखळ विनोद आहे. त्याकडे विनोदाच्या नजरेतूनच पाहावे. यातून कोणत्याही प्रकारे कोणाच्याही भावना दुखावण्याचा हेतू नाही.)