Marathi Jokes : आजकाल धावपळीच्या जीवनशैलीमुळे प्रत्येकाला ताणतणावाला सामोरं जावं लागतं. अशा वेळी माणसाला काही निवांत आणि मन प्रसन्न करणाऱ्या क्षणांची सोबत हवी असते. शब्द ही सोबत देऊ शकतात. हे लक्षात घेऊन तुम्हाला तणावमुक्त आणि सकारात्मक ठेवण्यासाठी आम्ही काही मजेदार जोक्स घेऊन आलो आहोत. ते वाचून तुम्हाला हसू आवरणार नाही! वाचा तर मग…
भिकारी - साहेब १० रुपये द्या ना, दोन दिवसांपासून उपाशी आहे.
साहेब - लाज नाही वाटत. रस्त्यावर उभा राहून भीक मागतोस?
भिकारी - (ताडकन्) मग काय भीक मागण्यासाठी ऑफिस उघडून बसू का?
(साहेब तोंडात मारल्यासारखे निघून गेले)
…
मूडमध्ये असलेल्या नवऱ्यानं आज जेवण बनवलं.
बायको - तुम्ही ही जी भाजी बनवलीय तिचं नाव काय?
नवरा - असं का विचारतेयस?
बायको - वर जाऊन मलाच उत्तर द्यावं लागेल ना.
काय खाऊन मेले होते ते!
…
सासू : देवाने तुला दोन डोळे फक्त मोबाइल बघण्यासाठी दिलेले नाहीत.
बाकी काही जमत नसेल तर किमान भातामधले २-४ खडे तरी निवडत जा!
सून : देवाने तुम्हाला सुद्धा ३२ दात फक्त माझी निंदा करायला दिलेले नाहीत.
चांगलं बोलता येत नसेल तर जेवणातले २-४ दगड सुद्धा तरी चावा...
(टीप : हा निखळ विनोद आहे. त्याकडे विनोदाच्या नजरेतूनच पाहावे. यातून कोणत्याही प्रकारे कोणाच्याही भावना दुखावण्याचा हेतू नाही. स्त्रोत - व्हॉट्सअॅप)
संबंधित बातम्या