Marathi Jokes : आजकाल धावपळीच्या जीवनशैलीमुळे प्रत्येकाला ताणतणावाला सामोरं जावं लागतं. अशा वेळी माणसाला काही निवांत आणि मन प्रसन्न करणाऱ्या क्षणांची सोबत हवी असते. शब्द ही सोबत देऊ शकतात. हे लक्षात घेऊन तुम्हाला तणावमुक्त आणि सकारात्मक ठेवण्यासाठी आम्ही काही मजेदार जोक्स घेऊन आलो आहोत. ते वाचून तुम्हाला हसू आवरणार नाही! वाचा तर मग…
घरी आलेल्या जावयाला सासू आठवडाभर पालकची भाजी करून खायला घालत होती…
रोज रोज तेच खाऊन जावई कंटाळला…
शेवटी न राहवून एक दिवस तो बोललाच!
मामी, तुमचा भाज्यांचा मळा दाखवून ठेवा ना
मी स्वत:च जाऊन चरून येईन!
…
बंड्याच्या मस्तीखोर स्वभावामुळं गुरुजी वैतागले होते,
एक दिवस त्यांनी गृहपाठाच्या वह्या तपासायचं ठरवलं!
गुरुजी बंड्यापर्यंत आले,
बंड्या - तुझ्या सगळ्या वह्या बाहेर काढ.
गुरुजी - ही वही कशाची आहे?
बंड्या - कागदाची आहे.
गुरुजी - ते मलाही माहीत आहे.
बंड्या - मग कशाला विचारता?
(गुरुजी चक्कर येऊन पडले)
…
महिला - डॉक्टर माझं वजन कसं कमी होणार?
डॉक्टर - तुमची मान डावीकडं आणि उजवीकडं हलवायची!
महिला - कधी?
डॉक्टर - कुणी खाण्याचा आग्रह केला की?
…
(टीप : हा निखळ विनोद आहे. त्याकडे विनोदाच्या नजरेतूनच पाहावे. यातून कोणत्याही प्रकारे कोणाच्याही भावना दुखावण्याचा हेतू नाही. स्त्रोत - व्हॉट्सअॅप)