Viral Marathi Jokes : उत्तम आरोग्यासाठी शुद्ध हवा, शुद्ध पाणी व चांगल्या अन्नाबरोबरच खळखळून हसण्याचीही गरज असते. तुम्हालाही निरोगी राहायचं असेल तर हसण्याची सवय लावा.
गुरुजी - (बंड्याला) मला सांग, न्यायालयात गांधीजींचा फोटो कशाला लावतात?
बंड्या - (विचार केल्याचं नाटक करून) खिळ्याला.
गुरुजी हाफ डे घेऊन घरी गेले!
…
गुरुजी - कुणाकुणाला स्वर्गात जायचंय?
काही विद्यार्थी हात वर करतात.
गुरुजी - आता सांगा बरं, कुणाकुणाला नरकात जायचंय?
बाकीची काही मुलं हात वर करतात.
पण नंद्या दोन्ही वेळी हात वर करत नाही.
गुरुजी त्याला विचारतात, तू दोन्ही वेळा हात वर केला नाहीस. का रे?
गुरुजी, ज्यांना स्वर्गात जायचंय त्याना स्वर्गात जाऊ द्या, ज्यांना नरकात जायचंय त्यांना नरकात जाऊ द्या.
माझ्या आईनं मला सांगितलंय, शाळा सुटली की सरळ घरी ये, नाहीतर तंगडं तोडीन.
…
गुरुजी नंदूला विचारतात,
नंदू सांग बघू
कंडक्टर आणि ड्रायव्हरमध्ये काय फरक आहे.
गुरजी, कंडक्टर झोपला तर कोणाचंच तिकीट निघणार नाही.
ड्रायव्हर झोपला तर सर्वांचा तिकीट निघणार
गुरुजींनी शाळा सुटेपर्यंत मारला…
(टीप : हा निखळ विनोद आहे. त्याकडे विनोदाच्या नजरेतूनच पाहावे. यातून कोणत्याही प्रकारे कोणाच्याही भावना दुखावण्याचा हेतू नाही. स्त्रोत - व्हॉट्सअॅप)