joke of the day : तू अजून लग्न का केलं नाहीस, असं जेव्हा कोकिळा कावळ्याला विचारते…
मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  joke of the day : तू अजून लग्न का केलं नाहीस, असं जेव्हा कोकिळा कावळ्याला विचारते…

joke of the day : तू अजून लग्न का केलं नाहीस, असं जेव्हा कोकिळा कावळ्याला विचारते…

HT Marathi Desk HT Marathi
Updated May 30, 2024 09:53 AM IST

Marathi Short Jokes : हसण्यामुळं चेहऱ्याच्या स्नायूंचा व्यायाम होतो. चेहरा ताजातवाना आणि टवटवीत राहतो. तुम्हालाही तरुण दिसायचं असेल आणि निरोगी राहायचं असेल तर हसण्याची सवय लावा. हे जोक वाचा!

joke of the day : तू अजून लग्न का केलं नाहीस, असं जेव्हा कोकिळा कावळ्याला विचारते…
joke of the day : तू अजून लग्न का केलं नाहीस, असं जेव्हा कोकिळा कावळ्याला विचारते…

Viral Jokes In Marathi : आजकाल धावपळीच्या जीवनशैलीमुळे प्रत्येकाला ताणतणावाला सामोरं जावं लागतं. अशा वेळी माणसाला काही निवांत आणि मन प्रसन्न करणाऱ्या क्षणांची सोबत हवी असते. शब्द ही सोबत देऊ शकतात. हे लक्षात घेऊन तुम्हाला तणावमुक्त आणि सकारात्मक ठेवण्यासाठी आम्ही काही मजेदार जोक्स घेऊन आलो आहोत. ते वाचून तुम्हाला हसू आवरणार नाही! वाचा तर मग…

तुला उद्या फाशी होणार आहे…

बोल तुझी शेवटची इच्छा काय आहे?

कैदी - साहेब, मला टरबूज खायचं आहे.

जेलर - पण हा टरबूजाचा सीझन नाही.

कैदी - काही हरकत नाही, मी तोपर्यंत वाट बघेन.

कोकिळेनं कावळ्याला विचारलं, तू अजून लग्न का केलं नाहीस?

कावळा म्हणाला - लग्न झालं नसतानाच आयुष्यात इतकी काव-काव आहे,

लग्न झालं तर काय होईल?

गुरुजी - १० मार्कांच्या एका प्रश्नाचं उत्तर द्या.

विद्यार्थी - गुरुजी, तुम्ही प्रश्न विचारा

शिक्षक - मला सांगा, सर्वात जास्त कॉपी कुठे होते?

विद्यार्थी- गुरुजी, व्हॉट्सॲपवर

शिक्षक: छान, हे घे १० पैकी १०.

यूपीमध्ये एका महिलेच्या नवऱ्याला विजेचा धक्का लागला, तिनं दिल्लीतल्या डॉक्टरांना फोन केला.

बाई : डॉक्टर साहेब, माझ्या नवऱ्याला विजेचा शॉक लागलाय. 

मी काय करू? सांगा प्लीज

डॉक्टर: तुमच्या घरात लाइट आहे, त्याबद्दल देवाचे आभार माना!

 

(टीप : हा निखळ विनोद आहे. त्याकडे विनोदाच्या नजरेतूनच पाहावे. यातून कोणत्याही प्रकारे कोणाच्याही भावना दुखावण्याचा हेतू नाही. स्त्रोत - व्हॉट्सअ‍ॅप)

Whats_app_banner