Viral Jokes In Marathi : आजकाल धावपळीच्या जीवनशैलीमुळे प्रत्येकाला ताणतणावाला सामोरं जावं लागतं. अशा वेळी माणसाला काही निवांत आणि मन प्रसन्न करणाऱ्या क्षणांची सोबत हवी असते. शब्द ही सोबत देऊ शकतात. हे लक्षात घेऊन तुम्हाला तणावमुक्त आणि सकारात्मक ठेवण्यासाठी आम्ही काही मजेदार जोक्स घेऊन आलो आहोत. ते वाचून तुम्हाला हसू आवरणार नाही! वाचा तर मग…
गुरुजी - भाषण आणि गझल यात काय फरक आहे?
बंड्या - गुरुजी शेजारणीचा प्रत्येक शब्द हा गझल असतो आणि
बायकोचा प्रत्येक शब्द हे भाषण असतं.
(गुरुजींनी मनोमन बंड्याचा सत्कार केला)
…
मुलगी - आज २५ सेल्फी घेतल्यानंतर ही जाणीव झाली की,
मनाच्या सौंदर्यापेक्षा मोठी गोष्ट दुसरी कुठलीही नाही!
म्हणून सगळ्या डिलिट केल्या!
…
पिंट्या आज शाळेतून लवकर घरी आला!
आई - काय झालं बाळा, आज लवकर कसा आलास?
पिंट्या - मी एक मच्छर मारला म्हणून बाईंनी घरी पाठवून दिलं.
आई - काय एक मच्छर मारला म्हणून घरी पाठवलं!
पिंट्या - हो आई, तो मच्छर बाईंच्या गालावर बसला होता!
…
(टीप : हा निखळ विनोद आहे. त्याकडे विनोदाच्या नजरेतूनच पाहावे. यातून कोणत्याही प्रकारे कोणाच्याही भावना दुखावण्याचा हेतू नाही. स्त्रोत - व्हॉट्सअॅप)