Viral Marathi Jokes : उत्तम आरोग्यासाठी शुद्ध हवा, शुद्ध पाणी व चांगल्या अन्नाबरोबरच खळखळून हसण्याचीही गरज असते. तुम्हालाही निरोगी राहायचं असेल तर हसण्याची सवय लावा.
शिक्षक - सांगा, सर्वात उंच उडणारा पक्षी कोणता?
पप्या - हत्ती
शिक्षक - नालायका, हत्ती हा पक्षी आहे का?
घरी अभ्यास कोण घेतं तुझा?
पप्या - आई
शिक्षक - मगं वडील काय करतात?
पप्या - ते दाऊद गँगमध्ये शार्पशूटर आहेत.
शिक्षक - मुलांनो, लिहा हत्ती हा सर्वात उंच उडणारा पक्षी आहे.
चुकीला माफी नाही…
…
ट्रॅफिक सिग्नलवर एका भिकाऱ्याला पाहून माणूस बोलला...
तुला कुठंतरी पाहिल्यासारखं वाटतंय!
भिकारी खूप हसला... खूप हसला… आणि म्हणाला…
साहेब… आपण फेसबुकवर फ्रेंड आहोत!
…
ज्यांना कोणत्याही पक्षानं तिकीट दिलं नाही ,
त्यांना आम्ही तिकीट देऊ .
बृहन्मुंबई विद्युत पुरवठा आणी परिवहन उपक्रम
तिकीट घेऊनच प्रवास करा!
(टीप : हा निखळ विनोद आहे. त्याकडे विनोदाच्या नजरेतूनच पाहावे. यातून कोणत्याही प्रकारे कोणाच्याही भावना दुखावण्याचा हेतू नाही. स्त्रोत - व्हॉट्सअॅप)