
Viral Marathi Jokes : उत्तम आरोग्यासाठी शुद्ध हवा, शुद्ध पाणी व चांगल्या अन्नाबरोबरच खळखळून हसण्याचीही गरज असते. तुम्हालाही निरोगी राहायचं असेल तर हसण्याची सवय लावा.
बाई - (पोलिसांना) माझे मिस्टर तीन दिवसांपूर्वी गिरणीवर दळण आणायला गेले होते. अजून परत आले नाहीत.
पोलीस - मग तुम्ही तीन दिवस काय करत होता?
बाई - पहिल्या दिवशी इडली केली, दुसऱ्या दिवशी पोहे केले.
तिसऱ्या दिवशी थालीपीठ केलं. शेवटी घरातलं पीठ संपलं म्हणून तुमच्याकडं आले.
…
मुलगा लग्नासाठी मुलगी पाहायला जातो…
मुलगा - मला काटकसर करणारी मुलगी हवी
मुलीची आई - आमची मुलगी अगदी तशीच आहे.
ती बॉरबॉन बिस्किटांवरची साखर चहासाठी वापरते…
…
बायको - मी ड्राइवरला नोकरीवरून काढतेय.
कारण आज दुसरी वेळ मी मरता मरता वाचलेय.
नवरा: डार्लिंग प्लीज, त्याला अजून एक चान्स दे ना!
(टीप : हा निखळ विनोद आहे. त्याकडे विनोदाच्या नजरेतूनच पाहावे. यातून कोणत्याही प्रकारे कोणाच्याही भावना दुखावण्याचा हेतू नाही. स्त्रोत - व्हॉट्सअॅप )
संबंधित बातम्या
