मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  joke of the day : वॉचमनच्या नोकरीसाठी इंटरव्यू देणाऱ्या बंड्याला जेव्हा इंग्रजी येतं का असं विचारलं जातं…

joke of the day : वॉचमनच्या नोकरीसाठी इंटरव्यू देणाऱ्या बंड्याला जेव्हा इंग्रजी येतं का असं विचारलं जातं…

HT Marathi Desk HT Marathi
May 30, 2024 09:49 AM IST

Marathi Short Jokes : हसण्यामुळं चेहऱ्याच्या स्नायूंचा व्यायाम होतो. चेहरा ताजातवाना आणि टवटवीत राहतो. तुम्हालाही तरुण दिसायचं असेल आणि निरोगी राहायचं असेल तर हसण्याची सवय लावा. हे जोक वाचा!

joke of the day : वॉचमनच्या नोकरीसाठी इंटरव्यू देणाऱ्या बंड्याला जेव्हा इंग्रजी येतं का असं विचारलं जातं…
joke of the day : वॉचमनच्या नोकरीसाठी इंटरव्यू देणाऱ्या बंड्याला जेव्हा इंग्रजी येतं का असं विचारलं जातं…

Viral Jokes In Marathi : आजकाल धावपळीच्या जीवनशैलीमुळे प्रत्येकाला ताणतणावाला सामोरं जावं लागतं. अशा वेळी माणसाला काही निवांत आणि मन प्रसन्न करणाऱ्या क्षणांची सोबत हवी असते. शब्द ही सोबत देऊ शकतात. हे लक्षात घेऊन तुम्हाला तणावमुक्त आणि सकारात्मक ठेवण्यासाठी आम्ही काही मजेदार जोक्स घेऊन आलो आहोत. ते वाचून तुम्हाला हसू आवरणार नाही! वाचा तर मग…

ट्रेंडिंग न्यूज

आज जेव्हा मी गाडीतून उतरलो तेव्हा

एका माणसानं विचारलं…

भाऊ, हे कुठलं स्टेशन आहे.

मीही लगेच उत्तर दिलं, रेल्वे स्टेशन

एवढ्याशा गोष्टीवरून कानाखाली मारायची काय गरज होती?

ज्ञानगोष्टी…

आपल्या शेजाऱ्यांशी नेहमी चांगले संबंध ठेवा…

मुलीकडचे लोक आपली माहिती त्यांच्याकडून काढतात!

आजकाल दिवस खूप खराब आहेत. कुणाचाही भरवसा राहिला नाही.

मी पिक्चर बघत होतो.

तहान लागली म्हणून पाणी प्यायला गेलो तेवढ्यात,

गुंड हिरोइनला उचलून घेऊन गेले!

बंड्या सेक्युरिटी गार्डच्या मुलाखतीसाठी गेला…

साहेब - तुम्हाला इंग्लिश येतं का?

बंड्या सहज बोलून गेला…

चोर इंग्लंडवरून येणार आहेत का?

 

(टीप : हा निखळ विनोद आहे. त्याकडे विनोदाच्या नजरेतूनच पाहावे. यातून कोणत्याही प्रकारे कोणाच्याही भावना दुखावण्याचा हेतू नाही. स्त्रोत - व्हॉट्सअ‍ॅप)

WhatsApp channel
विभाग