Viral Jokes In Marathi : आजकाल धावपळीच्या जीवनशैलीमुळे प्रत्येकाला ताणतणावाला सामोरं जावं लागतं. अशा वेळी माणसाला काही निवांत आणि मन प्रसन्न करणाऱ्या क्षणांची सोबत हवी असते. शब्द ही सोबत देऊ शकतात. हे लक्षात घेऊन तुम्हाला तणावमुक्त आणि सकारात्मक ठेवण्यासाठी आम्ही काही मजेदार जोक्स घेऊन आलो आहोत. ते वाचून तुम्हाला हसू आवरणार नाही! वाचा तर मग…
माहेरी गेलेल्या पत्नीनं काही दिवसांनी नवऱ्याला फोन केला आणि म्हणाली,
बायको - आता मला घेऊन जा!
नवरा - आणखी काही दिवस राहा!
बायको - नको ओ… आई, बाबा, भाऊ, भावजय सगळ्यांशी दोन-दोन वेळा भांडले, पण…
त्या भांडणात तुमच्यासारखी मजा नाही!
…
संतू आणि अंतू खूप दिवसांनी भेटतात!
संतू - अरे तू इतका जाड कसा झालास?
अंतू - आमच्या घरात फ्रीज नाही ना…
संतू - फ्रीजचा आणि तुझ्या जाड होण्याचा काय संबंध?
अंतू - दुसऱ्या दिवसासाठी काही ठेवता येत नाही ना. सगळं त्याच दिवशी खावं लागतं.
…
प्रियकर - लग्नानंतर तू आपल्यासाठी दुसरं घर घ्या अशी भुणभुण तर लावणार नाहीस ना?
प्रेयसी - नाही, मी तशी मुलगी नाही.
तू तुझ्या आई-बाबांसाठी वेगळं घर घे.
(प्रियकर अजूनही बेशुद्ध आहे)
…
(टीप : हा निखळ विनोद आहे. त्याकडे विनोदाच्या नजरेतूनच पाहावे. यातून कोणत्याही प्रकारे कोणाच्याही भावना दुखावण्याचा हेतू नाही. स्त्रोत - व्हॉट्सअॅप)
संबंधित बातम्या