Viral Marathi Jokes : उत्तम आरोग्यासाठी शुद्ध हवा, शुद्ध पाणी व चांगल्या अन्नाबरोबरच खळखळून हसण्याचीही गरज असते. तुम्हालाही निरोगी राहायचं असेल तर हसण्याची सवय लावा.
परीक्षेच्या पेपरमध्ये एक प्रश्न आला…
शास्त्रीय कारणे लिहा…
डोक्यावर पांघरूण घेऊन झोपू नये
बंड्यानं लिहिलं, कारण कोण झोपलाय ते कळत नाही!
मास्तरांनी बदाबदा बडवला!
…
शेवटी आज आई बोललीच!
बाळा, बायको कमी शिकलेली असली तरी चालेल,
पण फेसबुक, व्हॉट्सअॅप वापरणारी नसावी!
आपल्या घरी कामं पण असतात!
…
सासू - प्लेट घासल्यावर त्यात चेहरा दिसायला हवा इतकी स्वच्छ करत जा.
सून - उद्यापासून आरशावरच जेवत जा.
…
डॉक्टरनं चारूला तपासून सांगितले की तिला कोणताही आजार झालेला नाही.
केवळ विश्रांतीची गरज आहे.
त्यावर चारू म्हणाली, पण डॉक्टर तुम्ही माझी जीभ तर तपासलीच नाही.
डॉक्टर - तिला सुद्धा विश्रांतीची गरज आहे.
(टीप : हा निखळ विनोद आहे. त्याकडे विनोदाच्या नजरेतूनच पाहावे. यातून कोणत्याही प्रकारे कोणाच्याही भावना दुखावण्याचा हेतू नाही. स्त्रोत - व्हॉट्सअॅप)