Viral Marathi Jokes : उत्तम आरोग्यासाठी शुद्ध हवा, शुद्ध पाणी व चांगल्या अन्नाबरोबरच खळखळून हसण्याचीही गरज असते. तुम्हालाही निरोगी राहायचं असेल तर हसण्याची सवय लावा.
एक दिवस असा येईल की पृथ्वीवर पाणी नसेल.
सगळे जीवजंतू नष्ट होऊ जातील.
बंड्या - गुरुजी, त्या दिवशी शाळेत यायचं की नाही तेवढंं फक्त सांगा.
…
एक मुलगी आपल्या होणाऱ्या नवऱ्याला मेसेज करते.
सॉरी, आपलं लग्न होऊ शकत नाही.
माझं दुसऱ्या एका मुलासोबत लग्न ठरलं आहे.
मेसेज वाचून मुलगा खूप दु:खी होतो. त्याच्या डोळ्यातून अश्रू येतात
दोन मिनिटांनी त्याला पुन्हा मेसेज येतो.
सॉरी…. सॉरी….
चुकून तुम्हाला मेसेज सेंट झाला!
…
एक उंदीर वाघाच्या लग्नात खूप जोशात येऊन नाचत असतो.
लग्नाला आलेला हत्ती हे पाहून चकित होतो आणि त्याला विचारतो…
तू इतका खूष का झालायस?
किती जोषात नाचतोयस?
उंदीर म्हणतो, मित्रा तुला नाही कळणार ते!
माझ्या लग्नाच्या आधी मी सुद्धा वाघ होतो.
(टीप : हा निखळ विनोद आहे. त्याकडे विनोदाच्या नजरेतूनच पाहावे. यातून कोणत्याही प्रकारे कोणाच्याही भावना दुखावण्याचा हेतू नाही. स्त्रोत - व्हॉट्सअॅप)
संबंधित बातम्या