Viral Marathi Jokes : उत्तम आरोग्यासाठी शुद्ध हवा, शुद्ध पाणी व चांगल्या अन्नाबरोबरच खळखळून हसण्याचीही गरज असते. तुम्हालाही निरोगी राहायचं असेल तर हसण्याची सवय लावा.
बंड्या लग्नासाठी गावाकडे मुलगी बघायला जातो…
बघण्याचा कार्यक्रम सुरू होतो. बंड्या मुलीला प्रश्न विचारतो,
तुला व्हॉट्सअॅप चालवता येतं का?
मुलगी - नाही लग्नानंतर तुम्हीच चालवा. मी मागे बसेन
बंड्या खूष होऊन जोरात ओरडतो…
मला हीच मुलगी पाहिजे!
…
मराठीचा तास सुरू असतो.
गुरुजी म्हण आणि वाक्प्रचार शिकवत असतात.
गुरुजी एका म्हणीचा अर्थ विचारतात.
सापाच्या शेपटीवर पाय देणे…
बंड्या - बायकोला माहेरी जाण्यापासून अडवणे
गुरुजी बंड्याला मिठी मारतात!
…
नंदू नापास होतो म्हणून गुरुजी त्याच्या आई-वडिलांना बोलावतात.
गुरुजी - मी नंद्याला विचारलं.
जर माझ्याकडं ५ केळी आहेत, त्यातली ३ मी खाल्ली तर किती उरली.
त्याला २ केळी हे साधं उत्तर देता आलं नाही.
नंदूची आई - काय मास्तर, २ केळासाठी पोराला नापास केलात.
उद्या दोन डझन पाठवून देते.
गुरुजींनी शाळा सोडली!
(टीप : हा निखळ विनोद आहे. त्याकडे विनोदाच्या नजरेतूनच पाहावे. यातून कोणत्याही प्रकारे कोणाच्याही भावना दुखावण्याचा हेतू नाही. स्त्रोत - व्हॉट्सअॅप)
संबंधित बातम्या