Viral Marathi Jokes : उत्तम आरोग्यासाठी शुद्ध हवा, शुद्ध पाणी व चांगल्या अन्नाबरोबरच खळखळून हसण्याचीही गरज असते. तुम्हालाही निरोगी राहायचं असेल तर हसण्याची सवय लावा.
भयंकर समस्या!
होळीला कपाट उघडलं तर सगळे कपडे नवे वाटतात.
आणि…
दिवाळीला कपाट उघडलं तर सगळे कपडे जुने वाटतात!
…
नवरा - मी जरा मित्राकडे चक्कर टाकून येतो.
बायको - चक्कर येईल इतकी टाकून येऊ नका म्हणजे झालं!
नवरा काही न बोलता गुपचूप सटकतो!
…
सासू - जावईबापू पुढच्या जन्मी कोणता जन्म घ्यायला आवडेल.
जावई - भिंतीवरच्या पालीचा.
तुमची मुलगी फक्त तिलाच घाबरते.
(टीप : हा निखळ विनोद आहे. त्याकडे विनोदाच्या नजरेतूनच पाहावे. यातून कोणत्याही प्रकारे कोणाच्याही भावना दुखावण्याचा हेतू नाही. स्त्रोत - व्हॉट्सअॅप)