Viral Marathi Jokes : उत्तम आरोग्यासाठी शुद्ध हवा, शुद्ध पाणी व चांगल्या अन्नाबरोबरच खळखळून हसण्याचीही गरज असते. तुम्हालाही निरोगी राहायचं असेल तर हसण्याची सवय लावा.
गावामध्ये एक मुलगा एका म्हशीवर बसून फिरत असतो…
मुलगी (थट्टेने) - अरे माकडा, हेल्मेट घाल नाहीतर पोलीस पकडतील
मुलगा - हेच, म्हणून मुलींना लायसन्स दिलं नाही पाहिजे.
बावळट ही फोर व्हीलर आहे…
…
नवीन लग्न झालेलं जोडपं भाजी आणायला बाजारात जातं.
भाजीवाला विचारतो, मॅडम खूप शिकलेल्या आहेत वाटतं.
नवरा (खूष होऊन) - हो इंजिनीयर आहे ती. तुम्हाला कसं कळलं?
भाजीवाला - त्यांनी पिशवीत खाली टोमॅटो आणि वरती कलिंगड ठेवलाय म्हणून अंदाज बांधला!
…
लहानपणीची अफवा…
बेडकाला दगड मारला की मुकी बायको मिळणार असं म्हणायचे लोक.
तेव्हा जाम घाबरायचो.
आता वाटतं, दगड मारला असतं तर किती बरं झालं असतं!
(टीप : हा निखळ विनोद आहे. त्याकडे विनोदाच्या नजरेतूनच पाहावे. यातून कोणत्याही प्रकारे कोणाच्याही भावना दुखावण्याचा हेतू नाही. स्त्रोत - व्हॉट्सअॅप)
संबंधित बातम्या