मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Joke of the day : मुलीची आई जेव्हा मुलाकडच्या लोकांसमोर स्वत:च्या पोरीचं कौतुक करते…

Joke of the day : मुलीची आई जेव्हा मुलाकडच्या लोकांसमोर स्वत:च्या पोरीचं कौतुक करते…

HT Marathi Desk HT Marathi
Mar 21, 2024 09:49 AM IST

Marathi Short Jokes : हसण्यामुळं चेहऱ्याच्या स्नायूंचा व्यायाम होतो. चेहरा ताजातवाना आणि टवटवीत राहतो. तुम्हालाही तरुण दिसायचं असेल आणि निरोगी राहायचं असेल तर हसण्याची सवय लावा. हे जोक वाचा!

Joke of the day : मुलीची आई जेव्हा मुलाकडच्या लोकांसमोर स्वत:च्या पोरीचं कौतुक करते…
Joke of the day : मुलीची आई जेव्हा मुलाकडच्या लोकांसमोर स्वत:च्या पोरीचं कौतुक करते…

 

Viral Marathi Jokes : उत्तम आरोग्यासाठी शुद्ध हवा, शुद्ध पाणी व चांगल्या अन्नाबरोबरच खळखळून हसण्याचीही गरज असते. तुम्हालाही निरोगी राहायचं असेल तर हसण्याची सवय लावा.

 

दारुड्यांचं एक टोळकं रस्त्यानं चाललेलं असतं…

त्यातला एक जण रस्त्यात असलेल्या एका घराचं दार ठोठावतो

एक बाई दरवाजा उघडते,

दारुडा म्हणतो, तुकारामचं घर हेच ना!

बाई - हो

दारुडा - मग आमच्यातला तुकाराम कोण आहे ते ओळखून घरात घ्या ना!

अहो, मला नवीन साडी पाहिजे

ती अम्मा जान कडून मागवा ना…

नंद्या - अम्मा जान कोण?

बायको - ते नाही का? अपनी दुकान… अम्मा जान… अम्मा जान…

नंद्या - ए सर्किट, अम्मा जान नाही, अ‍ॅमेझॉन आहे ते.

गुणी आहे हो मुलगी…

स्वयंपाक नाही करता आला म्हणून काय झालं…

.

तिला ऑनलाइन सगळं मागवता येतं…

 

(टीप : हा निखळ विनोद आहे. त्याकडे विनोदाच्या नजरेतूनच पाहावे. यातून कोणत्याही प्रकारे कोणाच्याही भावना दुखावण्याचा हेतू नाही. स्त्रोत - व्हॉट्सअ‍ॅप)

WhatsApp channel

विभाग