मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Joke of the day : काकूंना जेव्हा लाटण्याची व्याख्या विचारली जाते…

Joke of the day : काकूंना जेव्हा लाटण्याची व्याख्या विचारली जाते…

HT Marathi Desk HT Marathi
Mar 20, 2024 09:58 AM IST

Marathi Short Jokes : हसण्यामुळं चेहऱ्याच्या स्नायूंचा व्यायाम होतो. चेहरा ताजातवाना आणि टवटवीत राहतो. तुम्हालाही तरुण दिसायचं असेल आणि निरोगी राहायचं असेल तर हसण्याची सवय लावा. हे जोक वाचा!

Joke of the day : काकूंना जेव्हा लाटण्याची व्याख्या विचारली जाते…
Joke of the day : काकूंना जेव्हा लाटण्याची व्याख्या विचारली जाते…

 

Viral Marathi Jokes : उत्तम आरोग्यासाठी शुद्ध हवा, शुद्ध पाणी व चांगल्या अन्नाबरोबरच खळखळून हसण्याचीही गरज असते. तुम्हालाही निरोगी राहायचं असेल तर हसण्याची सवय लावा.

नवरा - तुझ्या वडिलांना वाईट सवय आहे. त्यांची ती सवय जातच नाही.

बायको - काय झालं एवढं? काय केलं बाबांनी?

नवरा - जखमेवर मीठ चोळण्याची त्यांची सवय जातच नाही.

बायको - अहो काय झालं सांगाल की नाही? कोड्यात काय बोलताय?

नवरा - तुझे बाबा आज पुन्हा मला विचारत होते की, माझ्या मुलीशी लग्न करून तुम्ही सुखी आहात ना?

बायको - अहो, बंड्या आता घरातले पैसे लंपास करायला लागलाय.

नवरा - त्याचं काहीतरी करायला पाहिजे.

बायको - कुठेही पैसे लपवले तरी तो शोधून काढतोच आणि बाहेर जाऊन काहीतरी खाऊन येतो.

नवरा - तू एक काम कर… त्याच्या पुस्तकात लपवून ठेव. किमान परीक्षा होईपर्यंत तरी पैसे सुरक्षित राहतील.

एक क्वीज शोमध्ये कदम काकूंना प्रश्न विचारला जातो,

लाटण्याची व्याख्या काय?

कदम काकू - लाटणं म्हणजे अशी वस्तू ज्यामुळं चपात्या गोल आणि नवरा सरळ होतो.

 

(टीप : हा निखळ विनोद आहे. त्याकडे विनोदाच्या नजरेतूनच पाहावे. यातून कोणत्याही प्रकारे कोणाच्याही भावना दुखावण्याचा हेतू नाही. स्त्रोत - व्हॉट्सअ‍ॅप)

विभाग