मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Joke of the day : बंड्या जेव्हा विज्ञानाच्या गुरुजींना शंका विचारतो…

Joke of the day : बंड्या जेव्हा विज्ञानाच्या गुरुजींना शंका विचारतो…

HT Marathi Desk HT Marathi
Mar 18, 2024 11:49 AM IST

Marathi Short Jokes : हसण्यामुळं चेहऱ्याच्या स्नायूंचा व्यायाम होतो. चेहरा ताजातवाना आणि टवटवीत राहतो. तुम्हालाही तरुण दिसायचं असेल आणि निरोगी राहायचं असेल तर हसण्याची सवय लावा. हे जोक वाचा!

Joke of the day : बंड्या जेव्हा विज्ञानाच्या गुरुजींना शंका विचारतो…
Joke of the day : बंड्या जेव्हा विज्ञानाच्या गुरुजींना शंका विचारतो…

 

Viral Marathi Jokes : उत्तम आरोग्यासाठी शुद्ध हवा, शुद्ध पाणी व चांगल्या अन्नाबरोबरच खळखळून हसण्याचीही गरज असते. तुम्हालाही निरोगी राहायचं असेल तर हसण्याची सवय लावा.

 

सुस्साट सुटलेल्या एका दुचाकीस्वाराला पोलीस हवालदार अडवतो…

पोलीस - सिग्नल दिसत नाही का? 

चल पावती फाड…

दुचाकीस्वार - तिकडं विजय मल्ल्या, नीरव मोदी, ललित मोदी हजारो कोटींचा चुना लावून गेले आणि तुम्ही आम्हाला…

पोलीस - ते फेसबुकवर टाक. इथं पावती फाड

तो तिला म्हणाला,

जिना सिर्फ मेरे लिए…

ती म्हणाली, ठीक आहे. मी लिफ्टने जाते.

तू ये जिन्याने…

हेही वाचा : नवरा जेव्हा बायकोला म्हणतो की, तू या घराला स्वर्ग बनवू शकतेस!

विज्ञानाचा धडा शिकवून झाल्यावर गुरुजी म्हणाले,

आता कोणाला काही प्रश्न असेल तर विचारा!

बंड्या - गुरुजी, फळा पुसल्यावर फळ्यावरची अक्षरं कुठे जातात?

गुरुजी फळ्यावर डोकं आपटून गेले!

 

(टीप : हा निखळ विनोद आहे. त्याकडे विनोदाच्या नजरेतूनच पाहावे. यातून कोणत्याही प्रकारे कोणाच्याही भावना दुखावण्याचा हेतू नाही. स्त्रोत - व्हॉट्सअ‍ॅप)

WhatsApp channel

विभाग