Viral Marathi Jokes : उत्तम आरोग्यासाठी शुद्ध हवा, शुद्ध पाणी व चांगल्या अन्नाबरोबरच खळखळून हसण्याचीही गरज असते. तुम्हालाही निरोगी राहायचं असेल तर हसण्याची सवय लावा.
एक साडी निवडण्यासाठी तुमची बायको जर संपूर्ण दुकान पालथे घालत असेल,
तर तुम्ही अभिमान बाळगला पाहिजे की…
तिनं तुम्हाला निवडलं आहे!
…
उत्कृष्ट कर्मचाऱ्याची सर्वोत्कृष्ट व्याख्या
जुन्या काळात जे लोक आपली भूक, झोप, घर-संसार आणि सर्व सुखाचा त्याग करत त्यांना ऋषीमुनी म्हणायचे…
आजकाल अशा लोकांना उत्कृष्ट कर्मचारी म्हणून गौरवतात!
…
भाषेचं सौंदर्य याला म्हणतात…
मी जेव्हा नववीत होतो, तेव्हा ती आठवीत होती!
आता ती नवविवाहित आहे आणि मी तिला आठवीत आहे…
(टीप : हा निखळ विनोद आहे. त्याकडे विनोदाच्या नजरेतूनच पाहावे. यातून कोणत्याही प्रकारे कोणाच्याही भावना दुखावण्याचा हेतू नाही. स्त्रोत - व्हॉट्सअॅप )
संबंधित बातम्या