Joke of the day : बायको जेव्हा हॉरर सिनेमा बघण्याची इच्छा व्यक्त करते…
मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Joke of the day : बायको जेव्हा हॉरर सिनेमा बघण्याची इच्छा व्यक्त करते…

Joke of the day : बायको जेव्हा हॉरर सिनेमा बघण्याची इच्छा व्यक्त करते…

HT Marathi Desk HT Marathi
Mar 13, 2024 09:46 AM IST

Marathi Short Jokes : हसण्यामुळं चेहऱ्याच्या स्नायूंचा व्यायाम होतो. चेहरा ताजातवाना आणि टवटवीत राहतो. तुम्हालाही तरुण दिसायचं असेल आणि निरोगी राहायचं असेल तर हसण्याची सवय लावा. हे जोक वाचा!

Joke of the day : बायको जेव्हा हॉरर सिनेमा बघण्याची इच्छा व्यक्त करते…
Joke of the day : बायको जेव्हा हॉरर सिनेमा बघण्याची इच्छा व्यक्त करते…

 

Viral Marathi Jokes : उत्तम आरोग्यासाठी शुद्ध हवा, शुद्ध पाणी व चांगल्या अन्नाबरोबरच खळखळून हसण्याचीही गरज असते. तुम्हालाही निरोगी राहायचं असेल तर हसण्याची सवय लावा.

 

बायको - मला सिनेमा बघायचाय!

नवरा - मग टीव्ही सुरू कर. बघ एखादा पिक्चर

बायको  - पण मला हॉरर पिक्चर बघायचा आहे.

नवरा - बरं मग, कपाटातनं आपल्या लग्नाची सिडी घेऊन ये…

नवरा - (लाडाने) माझं डोकं खूप दुखतंय. दाबून देतेस का?

बायको - आता मी कामात आहे. नंतर दाबते

नवरा - ठीक आहे.

बायको - लग्नाआधी कोण द्यायचं डोकं दाबून.

नवरा - लग्नाआधी डोकं दुखायचंच नाही!

ज्योतिषी - तुम्हाला तुमच्या नवऱ्याच्या भविष्याबद्दल काय जाणून घ्यायचंय?

बाई - तुम्ही मला फक्त त्यांच्या भूतकाळाबद्दल सांगा हो.

त्यावरून त्यांच्या भविष्याचं काय करायचं ते मी ठरवेन!

 

(टीप : हा निखळ विनोद आहे. त्याकडे विनोदाच्या नजरेतूनच पाहावे. यातून कोणत्याही प्रकारे कोणाच्याही भावना दुखावण्याचा हेतू नाही. स्त्रोत - व्हॉट्सअ‍ॅप )

Whats_app_banner