Viral Marathi Jokes : उत्तम आरोग्यासाठी शुद्ध हवा, शुद्ध पाणी व चांगल्या अन्नाबरोबरच खळखळून हसण्याचीही गरज असते. तुम्हालाही निरोगी राहायचं असेल तर हसण्याची सवय लावा.
नवरा-बायको फिरायला बाहेर निघाले…
कारमध्ये बसताच नवरा सीट बेल्ट लावायला लागला,
ते बघून बायको वैतागली!
नवऱ्याला काही कळेना, अचानक काय झालं?
त्यानं विचारलं तर म्हणते…
‘तुम्हाला माझ्या वट पौर्णिमेच्या व्रतावर जराही विश्वास राहिला नाही’
नवरा वडासारखा स्तब्ध झाला…
…
नवरा- तू तर म्हणाली होतीस की आज रात्रीच्या जेवणात दोन ऑप्शन्स आहेत
बायको - हो बरोबरच बोलली होती
नवरा - काय बरोबर? इथं तर एकच भाजी दिसतेय
बायको - ऑप्शन्स दोनच आहे.
एक म्हणजे, खायचं असेल तर खा.
दुसरा, नाहीतर बोंबलत जा!
जेवण संपेपर्यंत नवऱ्यानं मान वर केली नाही!
(टीप : हा निखळ विनोद आहे. त्याकडे विनोदाच्या नजरेतूनच पाहावे. यातून कोणत्याही प्रकारे कोणाच्याही भावना दुखावण्याचा हेतू नाही. स्त्रोत - व्हॉट्सअॅप )