मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Joke of the day : बायको जेव्हा पार्लरमध्ये जाण्यासाठी पैसे मागते…

Joke of the day : बायको जेव्हा पार्लरमध्ये जाण्यासाठी पैसे मागते…

HT Marathi Desk HT Marathi
Mar 04, 2024 09:44 AM IST

Marathi Short Jokes : हसण्यामुळं चेहऱ्याच्या स्नायूंचा व्यायाम होतो. चेहरा ताजातवाना आणि टवटवीत राहतो. तुम्हालाही तरुण दिसायचं असेल आणि निरोगी राहायचं असेल तर हसण्याची सवय लावा. हे जोक वाचा!

Joke of the day : बायको जेव्हा पार्लरमध्ये जाण्यासाठी पैसे मागते…
Joke of the day : बायको जेव्हा पार्लरमध्ये जाण्यासाठी पैसे मागते…

 

Viral Marathi Jokes : उत्तम आरोग्यासाठी शुद्ध हवा, शुद्ध पाणी व चांगल्या अन्नाबरोबरच खळखळून हसण्याचीही गरज असते. तुम्हालाही निरोगी राहायचं असेल तर हसण्याची सवय लावा.

 

बायको लाडात येऊन नवऱ्याला म्हणते,

अहो, ऐका ना!

नवरा -  (वैतागून) काय?

बायको - मला केसं सरळ करायला पार्लरमध्ये जायचंय. पैसे द्या ना!

नवरा - पार्लर कशाला पाहिजे? घरीच कर ना!

बायको - घरी नाही सरळ होत

नवरा - आख्खं खानदान सरळ केलंस आणि केस सरळ होत न्हाय व्हय तुझे

वडील - काय रे बंड्या, तू पायाचे अंगठे धरून का उभा आहेस?

बंड्या - तुम्हीच म्हणाला होतात ना बाबा की शाळेत जे करशील ते अर्धा-एक तास घरी करत जा म्हणून.

बाबांवर मन:शांतीसाठी ध्यानधारणा करण्याची वेळ आलीय!

एक बेवडा गच्चीतून खाली पडला!

आवाज झालेला ऐकून आजूबाजूचे धावत आले.

त्यांनी विचारलं काय रे काय झालं?

बेवडा - माहीत नाही ओ, मी पण आत्ताच खाली आलोय

 

(टीप : हा निखळ विनोद आहे. त्याकडे विनोदाच्या नजरेतूनच पाहावे. यातून कोणत्याही प्रकारे कोणाच्याही भावना दुखावण्याचा हेतू नाही. स्त्रोत - व्हॉट्सअ‍ॅप )

विभाग