Viral Marathi Jokes : उत्तम आरोग्यासाठी शुद्ध हवा, शुद्ध पाणी व चांगल्या अन्नाबरोबरच खळखळून हसण्याचीही गरज असते. तुम्हालाही निरोगी राहायचं असेल तर हसण्याची सवय लावा.
आज सकाळी ७ वाजता
बॉसला व्हॉट्सअॅपवर मेसेज टाइप करतच होतो की
तिकडूनच मेसेज आला!
काहीही टाइप कर
ऑफिसला यावंच लागेल!
…
आधुनिक संस्कार
वडील श्रीखंड घेऊन येतात
मुलगा लगेच हात न धुता डबा उघडायला जातो.
इतक्यात आईचं लक्ष जातं.
आई जोरात त्याला धपाटा मारते आणि म्हणते,
किती वेळा सांगितलं की,
आधी फोटो काढून व्हॉट्सअॅपवर टाकायचा आणि नंतर खायचं!
…
विज्ञानाचा तास चालू असतो. गुरुजी बंड्या विचारता…
गुरुजी - बंड्या सांग पाहू साखर ही आपली 'शत्रू' का असते?
बंड्या - कारण तिला हिंदीत 'चिनी' म्हणतात आणि
ती विरघळली की तिचा 'पाक' होतो!
गुरुजींनी व्हीआरएस घेतली असून ते सध्या रोजगार हमीवर काम करतात!
(टीप : हा निखळ विनोद आहे. त्याकडे विनोदाच्या नजरेतूनच पाहावे. यातून कोणत्याही प्रकारे कोणाच्याही भावना दुखावण्याचा हेतू नाही.)