Viral Marathi Jokes : उत्तम आरोग्यासाठी शुद्ध हवा, शुद्ध पाणी व चांगल्या अन्नाबरोबरच खळखळून हसण्याचीही गरज असते. तुम्हालाही निरोगी राहायचं असेल तर हसण्याची सवय लावा.
लग्नाच्या १८ वर्षांनंतर
बायको - मला पिझ्झा खायचा आहे.
नवरा लगेच पिझ्झा आणून देतो
बायको - थँक्स
नवरा - फक्त थँक्स
बायको लाजून - इश्श्य, आणखी काय आता? लव्ह यू म्हणू का?
नवरा - फालतुगिरी राहू दे. अर्धा-अर्धा कर.
नाहीतर एका बुक्कीतच दात पाडीन!
…
मुलीकडच्यांनी मला विचारलं…
तुला हुंड्यामध्ये काय पाहिजे?
मी म्हणालो, मुलीचा मोबाइल फोन आणि तिचं जुनं सिम कार्ड
लग्नच मोडलं ना राव!
मला अजूनही कळलं नाही की मी असं काय बोललो?
…
सेल्समन - आमच्या टूथपेस्टमध्ये लवंग, तुळस, कापूर, निलगिरी, विविध वृक्षांची पानं, फुलं, समीधा, तूप वगैरे सगळं आहे…
पुणेकर - नक्की काय करायचं आहे?
दात घासायचे आहेत की तोंडात यज्ञ करायचा आहे?
(टीप : हा निखळ विनोद आहे. त्याकडे विनोदाच्या नजरेतूनच पाहावे. यातून कोणत्याही प्रकारे कोणाच्याही भावना दुखावण्याचा हेतू नाही.)
संबंधित बातम्या