Viral Marathi Jokes : उत्तम आरोग्यासाठी शुद्ध हवा, शुद्ध पाणी व चांगल्या अन्नाबरोबरच खळखळून हसण्याचीही गरज असते. तुम्हालाही निरोगी राहायचं असेल तर हसण्याची सवय लावा.
पुण्यासाठी नवीन वाक्प्रचार:
आयुष्याचा नवले ब्रीज होणे…
अर्थ: आयुष्यात नवनवीन संकटे सतत येत राहणे
..
आयुष्याचा चांदणी चौक होणे…
अर्थ: आयुष्यात खूप कन्फ्युजन्स असणे.
…
आयुष्याचा युनिव्हर्सिटी चौक होणे…
अर्थ: आयुष्यात कधीही काहीही न सुधारणे
…
आयुष्याचा लक्ष्मी रोड होणे…
अर्थ : सुबत्ता येणे .. .
…
आयुष्याचा एफ.सी रोड होणे…
अर्थ - मैत्रिणींची वानवा नसणे
…
आयुष्याचा भिडे पूल होणे…
अर्थ: लहानसहान अडचणीतही आयुष्य पार वाहून जाणे
…
आयुष्याची पुणे मेट्रो होणे
अर्थ: दुसऱ्यासाठी कितीही काहीही करा, कुणालाच फारशी पर्वा नसणे
…
आयुष्याचा सिंहगड रस्ता होणे
अर्थ: कुणी कितीही मदत केली तरी आयुष्यातले bad patch संपण्याचे नाव नसणे
……
बंड्या - आय लव्ह यू
पोरीनं बंड्याच्या खाडकन् कानाखाली मारली…
काय बोललास तू?
मग बंड्यानंही पोरीच्या दोन कानाखाली पेटवल्या आणि म्हणाला,
ऐकूच आलं नव्हतं तर मला मारलंस कशाला?
स्त्रोत - सोशल मीडिया
(टीप : हा निखळ विनोद आहे. त्याकडे विनोदाच्या नजरेतूनच पाहावे. यातून कोणत्याही प्रकारे कोणाच्याही भावना दुखावण्याचा हेतू नाही.)
संबंधित बातम्या