Viral Marathi Jokes : उत्तम आरोग्यासाठी शुद्ध हवा, शुद्ध पाणी व चांगल्या अन्नाबरोबरच खळखळून हसण्याचीही गरज असते. तुम्हालाही निरोगी राहायचं असेल तर हसण्याची सवय लावा.
मुलगा - लाइफ पार्टनरबद्दल तुझ्या काय अपेक्षा आहेत?
मुलगी - त्याचा मस्त बंगला असावा!
मुलगा - बरं
मुलगी - बँक बॅलन्स भरपूर असावा
मुलगा - ओके
मुलगी - त्याची फोर व्हीलर असावी
मुलगा - बरं आणखी काही
मुलगी - तो एकटा असावा. आई-बाबा, भाऊ बहीण सोबत नसावे.
मुलगा - आणखी काही मॅडम
मुलगी - तो समजूतदार असावा.
मुलगा - तो समजूतदार असेल तर तुझ्याशी लग्न करेल का भिकारडे?
…
संतू - काय रे कुठं पळतोयस?
अंतू - अरे गर्लफ्रेंड मागे लागलीय!
संतू - अरे मग चांगलंय की. लोकांना गर्लफ्रेंड मिळत नाही
अंतू - अरे तसं नाही. काल तिला मस्करीत बोललो ‘दिल चिर के देख तेराही नाम होगा’…
तेव्हापासून ती चाकू घेऊन मागे लागलीय.
(टीप : हा निखळ विनोद आहे. त्याकडे विनोदाच्या नजरेतूनच पाहावे. यातून कोणत्याही प्रकारे कोणाच्याही भावना दुखावण्याचा हेतू नाही.)